प्रियांक पांचाळच्या नेतृत्वाखाली इंडिया रेड संघाने बंगळुरुत खेळवण्यात आलेल्या दुलीप करंडकाचं विजेतेपद पटकावलं. इंडिया ग्रीन संघावर १ डाव ३८ धावांनी मात करत इंडिया रेडने विजेतेपद खिशात घातलं. इंडिया रेड संघाच्या विजयात विदर्भाचा फिरकीपटू अक्षय वाखरेने मोलाची भूमिका बजावली. दुसऱ्या डावात अक्षय वाखरेने इंडिया ग्रीन संघाचा निम्मा संघ गारद केला. त्याच्या या कामगिरीवर खुश होत अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंहने अक्षयचं कौतुक केलं आहे.

अक्षयच्या कामगिरीची दखल घेत, हरभजनने कसोटी संघ तुझी वाट पाहतो आहे असं म्हणत अक्षय वाखरेच्या खेळीचं कौतुक केलंय.

गेल्या दोन हंगामांमध्ये विदर्भाच्या संघाने रणजी करंडकाचं विजेतेपद पटकावलं होतं. अक्षयने या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. सध्या रविचंद्रन आश्विन, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव यासारखे फिरकीपटू भारतीय कसोटी संघात खेळत आहेत. त्यामुळे निवड समिती अक्षय वाखरेच्या कामगिरीची दखल कधी घेते हे पहावं लागेल.

अवश्य वाचा – रविचंद्रन आश्विन अजुनही भारताचा सर्वोत्तम फिरकीपटू !

Story img Loader