पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने तिसरं लग्न केलं आहे. त्याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केल्याची बातमी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून दिली. शोएबचं हे तिसरं लग्न आहे पण सना ही पहिली पत्नी आहे जी पाकिस्तानी आहे. यापूर्वीच्या शोएबच्या दोन्ही पत्नी भारतीय होत्या. त्याच्या पहिल्या पत्नीचं नाव आयशा सिद्दीकी होतं, तर दुसरी पत्नी भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा होती.

शोएब मलिकचे पहिले लग्न २००२ मध्ये आयशा सिद्दीकीशी झालं होतं. शोएबच्या पहिल्या लग्नाचा खुलासा त्याने सानिया मिर्झाशी लग्न केलं, तेव्हा झाला होता. शोएब मलिक आणि सानिया मिर्झाच्या लग्नाआधी आयशा सिद्दीकीने आपण पाकिस्तानी क्रिकेटरची पहिली पत्नी असल्याचा दावा केला होता. यासंदर्भात ‘डीएनए’ ने वृत्त दिलं आहे.

siddharth shukla shehnaz gill
शहनाज गिलने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासाठी शेअर केली पोस्ट, ते दोन आकडे अन् चाहते म्हणाले…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
Rajender Meghwar Pakistans first Hindu cop
पाकिस्तानातील पहिले हिंदू पोलीस अधिकारी; कोण आहेत राजेंद्र मेघवार?
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात

सानिया मिर्झाचा संसार मोडला, शोएब मलिकने शेअर केले लग्नाचे फोटो; कोण आहे त्याची तिसरी पत्नी सना जावेद?

आयशा सिद्दीकी हैदराबादमधील रहिवासी आहे. तिला महा नावानेही ओळखलं जातं. आयशा शिक्षिका होती. आयशाने स्वतः खुलासा केला होता की शोएब मलिकने २००२ मध्ये तिच्याशी लग्न केलं होतं. तसेच पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता सानिया मिर्झाशी दुसरं लग्न केल्याचाही आरोपही शोएबवर झाला होता.

शोएब मलिकशी दुसरं लग्न केल्यावर अभिनेत्री सना जावेदने केला ‘हा’ मोठा बदल, इन्स्टाग्रामवर…

आयशाने हे दावे केल्यानंतर सुरुवातीला शोएबने त्याच्या पहिल्या लग्नाची बाब नाकारली होती, पण शेवटी आयशा ही त्याची पहिली पत्नी होती हे त्याने स्वीकार केलं होतं. आयशाने माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूविरुद्ध फसवणुकीचा गुन्हाही दाखल केला होता आणि पुरावा म्हणून शोएबसोबतच्या तिच्या लग्नाचा व्हिडिओ पोलिसांना दाखवला होता.

सानिया मिर्झाला शोएब मलिकच्या लग्नाबाबत आहे माहिती, ‘हा’ फोटो एकदा पाहाच!

या सर्व गोष्टी बाहेर आल्यानंतर शोएब मलिकने सानिया मिर्झाशी लग्न करण्यापूर्वी आयशाला घटस्फोट दिला. हे प्रकरण केवळ घटस्फोटावरच संपलं नव्हतं. तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, शोएबने आयशाला पोटगी म्हणून १५ कोटी रुपयेही दिले होते.

Story img Loader