अ‍ॅमस्टेलव्हीन : आत्मविश्वास दुणावलेला भारतीय महिला हॉकी संघ विश्वचषक हॉकी स्पर्धेत ‘ब’ गटातील आपल्या पहिल्या लढतीत रविवारी इंग्लंडचा सामना करेल. या वेळी संघाचा प्रयत्न विजयी प्रारंभासह टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पत्करलेल्या पराभवाचा वचपा काढण्याचाही असेल.

ऑलिम्पिकमध्ये ब्रिटनविरुद्ध झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत महिला संघाने ३-४ असा पराभव पत्करला होता. मग या संघाने या वर्षी मे महिन्यात जागतिक क्रमवारीत सर्वोत्तम सहावे स्थान मिळवले. तसेच ‘एफआयएच’ प्रो लीगमध्ये पदार्पणातच भारताने तिसरे स्थान पटकावले. विशेष म्हणजे भारतीय संघ बेल्जियम, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या पुढे होता. १९७४ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताने चौथे स्थान पटकावले होते. ही भारताची महिला विश्वचषक स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.

अनुभवी गोलरक्षक सविता पुनियाने राणी रामपालच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व सक्षमपणे पार पाडले. दुखापतीमुळे राणी टोक्यो ऑलिम्पिकनंतर संघाबाहेर आहे. सविताला युवा गोलरक्षक बिछू देवी खारीबामची साथ मिळेल. बचावाची जबाबदारी उपकर्णधार दीप ग्रेस एक्का, गुरजित कौर, उदिता आणि निक्की प्रधान यांच्यावर असेल. सुशिला चानू,  नेहा गोयल, नवजोत कौर, सोनिका, ज्योती आणि मोनिका मध्यरक्षकाच्या भूमिकेत असतील.

’ वेळ : रात्री ८ वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स ३, फस्र्ट

Story img Loader