Indian Women’s and Men’s Cricket Team Qualify for Quarter Finals: आशियाई क्रीडा २०२३ स्पर्धेमध्ये महिला संघांसह पुरुष संघ देखील क्रिकेट सामने खेळणार आहेत. यासाठी भारताच्या पुरुष संघाचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आले आहे. आता वेळापत्रकाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. एका अहवालानुसार, भारताच्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघाला आयसीसी टी-२० क्रमवारीच्या आधारे थेट उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळाले आहे. टीम इंडियाचा उपांत्यपूर्व सामना ५ ऑक्टोबरला होणार आहे. तर महिला संघांचे सामने १९ सप्टेंबरपासून सुरू होतील.
१ जूनपर्यंत आयसीसी टी-२० क्रमवारीत आशियातील अव्वल ४ संघांना थेट उपांत्यपूर्व फेरीत स्थान देण्यात आले आहे. ज्यामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या संघांचा समावेश आहे. पुरुष क्रिकेट संघ २८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर दरम्यान खेळवले जाणार आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत एकूण १८ संघ पुरुष क्रिकेट स्पर्धेत आणि १४ संघ महिला क्रिकेट स्पर्धेत भाग घेतील. भारतीय पुरुष संघाचा उपांत्यपूर्व सामना ५ ऑक्टोबर रोजी होईल, त्याच्या दुसऱ्याच दिवशी उपांत्य फेरीचा सामना होईल.
१९ ते २६ सप्टेंबर दरम्यान महिला क्रिकेटचे सामने खेळले जाणार आहेत, ज्यामध्ये हरमनप्रीत कौरला दोन सामन्यांच्या बंदीमुळे दोन्ही बाद फेरीचे सामने खेळता येणार नाहीत. २२ सप्टेंबर रोजी भारतीय महिला उपांत्यपूर्व फेरीत भिडतील. जर ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले, तर हा सामना २५ सप्टेंबरला होईल. २६ सप्टेंबर रोजी सुवर्ण आणि कांस्यपदकांचे सामने होणार आहेत.
हेही वाचा – IND vs WI: पहिल्या वनडे सामन्यानंतर रोहित शर्मावर चाहत्यांची सडकून टीका; म्हणाले, ‘संजू सॅमसनकडे…’
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी टीम इंडियाचे क्रिकेट संघ –
पुरुष संघ: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे आणि प्रभसिमरन सिंग.
महिला संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, अमनजोत कौर, देविका वैद्य, अंजली सरवानी, तितस साधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मणी, कनिका आहुजा, उमा छेत्री, आणि अनुषा बरेड्डी.