Indian women’s blind cricket team defeated Australia to win the gold medal: भारतीय महिला अंध क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. खरे तर भारतीय महिला अंध क्रिकेट संघाने आयबीएसए वर्ल्ड गेम्समध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले आहे. भारतीय महिला अंध क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ९ गडी राखून पराभव केला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना बर्मिंगहॅम येथे झाला. या सामन्यात भारतीय संघाने कांगारूंचा पराभव करत सुवर्णपदक जिंकले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताच्या महिला अंध क्रिकेट संघाने आयबीएसए वर्ल्ड गेम्समध्ये दमदार कामगिरी केली. भारताचा या स्पर्धेतील पहिला सामनाही ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता, ज्यात त्यांनी ८ गडी राखून विजय मिळवला होता. यानंतर टीम इंडियाने इंग्लंडचा पराभव केला. भारतीय संघाचा तिसरा सामनाही ऑस्ट्रेलियासोबत झाला. त्या सामन्यातही भारताने दणदणीत विजय मिळवला होता. एवढेच नाही तर आयबीएसए वर्ल्ड गेम्समध्ये टीम इंडियाला प्रथमच सुवर्णपदक जिंकण्यात यश आले आहे. यापूर्वी भारताच्या महिला अंध संघाला एकदाही सुवर्णपदक जिंकता आले नव्हते.

भारत-ऑस्ट्रेलियाचा असा राहिला सामना –

खरे तर आयबीएसए वर्ल्ड गेम्समध्ये प्रथमच क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. अशा प्रकारे भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. दुसरीकडे, भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ९ षटकात ८ विकेट गमावत ११४ धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना भारताने ३.३ षटकात १ गडी बाद ४३ धावा केल्या, मात्र त्यानंतर पावसामुळे खेळ थांबवावा लागला. मात्र, चांगल्या नेट रनरेटमुळे भारतीय संघाची विजेता म्हणून निवड करण्यात आली.

हेही वाचा – AFG vs PAK: पाकिस्तानी पत्रकाराने Mankading रनआऊटवर उपस्थित केला प्रश्न, एबी डिव्हिलियर्सने दिले चोख प्रत्युत्तर

आता भारतीय पुरुष संघाकडूनही सुवर्णपदकाची अपेक्षा –

त्याच वेळी, याशिवाय, भारतीय पुरुष अंध क्रिकेट संघाने आयबीएसए जागतिक खेळांमध्ये अंतिम फेरी गाठली आहे. आता अंतिम फेरीत भारतीय पुरुष अंध क्रिकेट संघासमोर पाकिस्तानचे आव्हान असेल. मात्र, भारतीय चाहत्यांना महिला संघानंतर पुरुष संघाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. मात्र, याआधी आयबीएसए वर्ल्ड गेम्सच्या साखळी सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघाचा पराभव केला होता. अशाप्रकारे साखळी सामन्यात पाकिस्तानला हरवून जेतेपदाच्या लढतीत झालेल्या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian womens blind cricket team defeated australia to win the gold medal at the ibsa world games vbm