भारतीय महिलांनी श्रीलंका आणि कॅनडाला नमवत राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. भारताने श्रीलंका आणि कॅनडाला दोन्ही संघांचा ३-० असा धुव्वा उडवला. मौमा दासने श्रीलंकेच्या इशारा मदुरंगीला नमवले. के. शामिनीने नुवानी विथांगेला ११-७, १४-१२, ११-८ असे नमवले. नेहा अगरवालने रिद्धमी कराडनआचचीचा ११-४, ११-६, ११-५ असा पराभव केला. कॅनडाविरुद्धच्या सामन्यात के. शामिनीने युआन सारावर ११-५, ११-५, ११-७ असा विजय मिळवला. मौमा दासने शिरले फुचा पराभव केला. तिसऱ्या लढतीत कॅनडाची खेळाडू अनुपस्थित राहिल्याने भारताला विजयी घोषित करण्यात आले.
पुरुषांच्या गटात अँथनी अमलराजला पराभवाचा धक्का बसला. मात्र अचंथा शरथ कमालने केन टाऊनसेंडला नमवले. सौम्यजित घोषने आपली लढत जिंकत भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवून दिला. भारतीय पुरुष संघाची पुढची लढत दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.

Story img Loader