आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज महिला क्रिकेटमधील ICC एकदिवसीय संघ आणि ICC टी२० संघाची घोषणा केली. महिला क्रिकेट खेळणाऱ्या सर्व संघांमधून सर्वोत्तम ११ खेळाडूंची निवड या संघामध्ये केली जाते. याबाबत अभिमानाची बाब म्हणजे भारताला यंदा टी२० विश्वविजेतेपद मिळवता आले नसले, तरी ICC टी२० संघाच्या कर्णधारपदाचा मान भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिला देण्यात आला आहे. तर ICC एकदिवसीय संघाचे नेतृत्व सुझी बेट्स हिच्याकडे देण्यात आले आहे.
Introducing the ICC 2018 Women’s T20I and ODI Teams of the Year!
https://t.co/SpvtvwrCXp pic.twitter.com/7BrqOFw295
— ICC (@ICC) December 31, 2018
—
ICC Women’s T20I Team of the Year 2018 संघात हरमनप्रीतव्यतिरिक्त स्मृती मानधना आणि पूनम यादव या दोघींचा समावेश आहे. २०१८ साली झालेल्या टी२० विश्वचषकात या दोघींनीही उल्लेखनीय कामगिरी केली होती.
Meet the ICC Women’s T20I Team of the Year 2018!