आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२३ ही स्पर्धा यंदा दक्षिण आफ्रिकेत आयोजित केली जात आहे. टीम इंडिया या स्पर्धेतील आपला पहिला सामना १२ फेब्रुवारीला पाकिस्तान संघाविरुद्ध खेळणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण भारतीय संघाची सलामीवीर स्मृती मंधाना दुखापतीतून अजून पूर्णपणे सावरलेली नाही.
सराव सामन्यादरम्यान मंधानाच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे ती अद्याप या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेली नाही. महिला टी-२० विश्वचषकात भारताला पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना रविवारी होणार आहे.
आयसीसीच्या एका सूत्राने सांगितले की, ‘सराव सामन्यादरम्यान तिला दुखापत झाली आहे. ती वर्ल्डकपमधून बाहेर पडेल की खेळू शकेल हे आत्ताच सांगू शकत नाही. पण ती पाकिस्तानविरुद्ध खेळू शकणार नाही.’
मंधाना उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे –
गेल्या दोन वर्षांत मंधानाने टी-२० विश्वचषकात चमकदार कामगिरी केली आहे. २०२१ च्या टी-२० विश्वचषकात ४६ च्या सरासरीने आणि १३८ च्या स्ट्राइक रेटसह ती भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती. तिने केवळ ५ डावात २३५ धावा केल्या, ज्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद ८३ होती. त्याचप्रमाणे, टी-२० विश्वचषक २०२२ च्या स्पर्धेत, मंधानाने तिचा चांगला फॉर्म कायम ठेवला आणि ती पुन्हा एकदा भारतासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक होती.
अंतिम सामना २६ फेब्रुवारीला होणार –
या स्पर्धेत १० संघांमध्ये एकूण २३ सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना २६ फेब्रुवारी रोजी न्यूलॅंड्स, केपटाऊन येथे खेळवला जाईल. नुकत्याच झालेल्या अंडर-१९ टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने बाजी मारली होती. अशा परिस्थितीत चाहत्यांना वरिष्ठ संघाकडूनही अशाच खेळाची अपेक्षा आहे.
भारतीय महिला संघ –
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, ऋचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवानी, पूजा वस्त्राकार, राजेश्वरी गायकवाड आणि राजेश्वरी गायकवाड.