Vinesh Phogat disqualified from Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्तीपटू विनेश फोगटने ५० किलो वजनी गटात खूप चांगलं प्रदर्शन केलं. विनेशने फायनलमध्ये प्रवेश करत क्युबाची कुस्तीपटू युसनेइलिस गुजमॅनवर एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र, कुस्तीपटू विनेश फोगट ५० किलो वजनी गटात अपात्र ठरली आहे. भारतीय चमूने तिच्या वजनासंदर्भात सर्वोत्तम प्रयत्न केले. मात्र सकाळी करण्यात आलेल्या वजनाच्या चाचणीत तिचे वजन ५० किलोपेक्षा जास्त वजन असल्याचं स्पष्ट झालं. वजन वाढल्यामुळे महिलांच्या ५० किलो वजनी गटातून कुस्तीपटू विनेश फोगट हिला अपात्र ठरवण्यात आलं. विनेश फोगटच्या अपात्रतेपूर्वी तिच्या वजनासंदर्भात कुस्तीपटू बजरंग पुनियाने बीबीसी हिंदीशी बोलताना भाष्य केलं होतं.

बजरंग पुनियाने काय म्हटलं होतं?

“माझं विनेश फोगटशी (Vinesh Phogat) बोलणं झालं होतं. तेव्हा मी म्हटलं होतं की, आता पहिलं टार्गेट हे अंतिम लढतीकडे राहुदे. कारण कोणताही खेळाडू विजयाच्या आधी जल्लोष करत नाही. जर विजयाच्या आधीच आनंद व्यक्त केला आणि त्यामध्येच समाधान मानलं तर कोणताही खेळाडू चांगली कामगिरी करू शकत नाही. तसेच गोल्ड मेडलचं जे टार्गेट आहे, त्याबाबतच बोलणं झालं होतं. तसेच वजन कमी करण्यासंदर्भातही बोलणं झालं होतं”, असं बजरंग पुनियाने (Bajrang Punia) म्हटलं.

Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Onion garlic became expensive while the prices of cotton soybeans decreased
ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष
Onion garlic shortage
बाजारात कांदा, लसणाचा तुटवडा ? जाणून घ्या, कांदा, लसणाच्या दरातील तेजी किती दिवस
Sanjay raut Maharashtra unsafe
Sanjay Raut: “मोदी जेव्हा येतात, तेव्हा महाराष्ट्र असुरक्षित”, संजय राऊत यांची टीका
siddhu mussewala fans commented on borthers video
Video : सिद्धू मूसेवालाच्या आठ महिन्यांच्या भावाचं झालं अन्नप्राशन; व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले, “त्याला प्रत्येक…”
white giant squirrel spotted in mahabaleshwar
Video : महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन !

हेही वाचा : विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले…

“कारण ५० किलो वजनात खेळणं खूप कठीण होऊन जातं. वजन कमी करण्यामध्ये मुलगा आणि मुलीमध्ये खूप फरक असतो. कारण मुलाचं वजन लवकर कमी होतं. पण मुलींना वजन कमी करण्यामध्ये अडचणी येतात. विनेश फोगटने तिचं वजन ५० किलोवर आणलं होतं. यासाठी मागील काही महिन्यांपासून तिचा डाएट प्लॅन सुरु होता. त्यामुळे या सर्व गोष्टी आहेत की, खेळाडू कधीही आधी आनंद व्यक्त करत नाही. एका खेळाडूला तेव्हाच आनंद होतो तेव्हा मेडलं मिळवलेलं असतं”, असंही बजरंग पुनियाने म्हटलं होतं.

विनेश फोगाट अंतिम फेरीसाठी अपात्र का?

विनेश फोगाट ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ५० किलो वजनी गटातून पात्र ठरली होती. पहिल्याच फेरीत गतविजेत्या सुसाकीला हरवून विनेशने सनसनाटी सुरुवात करून पुढे आणखी दोन प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध जिंकून अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीपूर्वी सकाळी घेण्यात आलेल्या वजन चाचणीत तिचे वजन अधिक भरल्याने विनेशला अपात्र ठरविण्यात आले.

विनेशचे वजन किती अधिक भरले?

अंतिम फेरीपूर्वी घेण्यात आलेल्या वजन चाचणीत विनेशचे वजन १०० ते १५० ग्रॅम अधिक भरल्याचे समोर आले आहे. ५० किलो वजनी गटात अंतिम तसेच कोणत्याही लढतीपूर्वी स्पर्धक मल्लाचे वजन ५० किलोंपेक्षा अधिक भरणे नियमबाह्य ठरते.

पदक कोणाला मिळणार?

विनेश अपात्र ठरल्यामुळे बुधवारी रात्री होणारा सुवर्णपदकाचा मुकाबला होणार नाही. विनेशची प्रतिस्पर्धी सारा अॅन हिल्डरब्रँटला सुवर्णपदक देण्यात येईल. ही लढतच होणार नसल्यामुळे रौप्यपदक कोणालाच देण्यात येणार नाही.