सर्व काही ठरल्याप्रमाणे झाले तर पुढील वर्षीपासून आयपीएलच्या धर्तीवर इंडियन कुस्ती लीग स्पर्धा सुरू होईल, असे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांनी सांगितले. ‘‘कुस्ती लीगसाठी आम्ही उत्सुक आहोत. फ्रँचायझींची निवड झाल्यानंतर आम्ही या स्पर्धेची अधिकृत घोषणा करू. २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत दोन पदके मिळवल्यानंतर या खेळाकडे अनेक जण आकर्षित झाले आहेत. २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये भारत आठ ते नऊ पदके मिळवेल, अशी आशा आहे,’’ असेही त्यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी सहा फ्रँचायझींची गरज असून आतापर्यंत फक्त चार संघ विकत घेण्यासाठी फ्रँचायझींनी आवड दर्शवली आहे. हरयाणा, उत्तर प्रदेश, पंजाब आणि महाराष्ट्रातून संघ विकत घेण्यासाठी जोरदार मागणी असल्याचे समजते.

Story img Loader