भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभुषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलक कुस्तीगीर अधिक आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी जंतरमंतरवर महापंचायतीचे आयोजन केले आहे. तसंच, आज सायंकाळी सात वाजता देशभर कँडल मार्च काढण्याचे आवाहन त्यांनी देशवासियांना केले आहे.

भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया यांनी यासंदर्भातील ट्वीट केले आहे. ते ट्वीटमध्ये म्हणतात की, “आज सायंकाळी सात वाजता संपूर्ण देशवासियांना आवाहन आहे की, आपल्या भारतीय मुलींच्या न्यायाच्या या लढाईत एकसाथ पूर्ण देशभर कँडल मार्च काढुयात.”

sachin pilot
धार्मिक मुद्द्यावर बोलणाऱ्या भाजपला ‘पढोगे तो बढोगे’ हे सांगण्याची वेळ; सचिन पायलट यांची टीका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Ajit Pawar Bhor Assembly Constituency
Ajit Pawar: ‘नायतर आम्हाला कुत्रं विचारणार नाही’, भरसभेतच अजित पवार भडकले, पोलिसांवर व्यक्त केला संताप
Sanju Samson meets Female Fan After Match Who Injured by His Massive Six Watch Video IND vs SA
संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO
Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Sharad Pawar Campaign, Wai-Khandala-Mahabaleshwar,
‘लाडक्या बहिणी’पेक्षा महिलांना संरक्षण हवे – शरद पवार
Nitin Gadkari Kothrud , Chandrakant Patil,
विकासासाठी महायुतीची गरज, नितीन गडकरी यांचे आवाहन

जंतर मंतरवर आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटूंनी काल पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. विनेश फोगाटने प्रसारमाध्यमांचे आभार मानत आपण जी लढाई लढत आहोत ती जिंकली पाहिजे असे सांगितले. ती म्हणाली की, “आमच्या समर्थनार्थ जंतरमंतरवर येणार्‍या सर्व लोकांना आवाहन करण्यात येते की, पोलिसांशी संघर्ष करू नये आणि त्यांना सहकार्य करावे. पोलिसांनाही विनंती आहे की, कोणालाही अडवू नका कारण तुम्ही सहकार्य कराल तर आम्हीही सहकार्य करू.”

हेही वाचा >> Wrestlers Protests: सौरव गांगुलीच्या विधानावर विनेश फोगाट भडकली म्हणाली, “…भाड मे जाये जनता”

सौरव गागुंलींवरही टीका

पत्रकार परिषदेदरम्यान भारतीय कुस्तीपटूंना विचारण्यात आले की टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणतो की, ही कुस्तीपटूंची लढाई आहे आणि त्यांनी ती स्वतःच स्वतःची लढली पाहिजे. यावर उत्तर देताना विनेश फोगाटने गांगुलीला टोला लगावला आणि म्हटले की, “अपना काम बनता भाड मे जाए जनता. प्रत्येक जण स्वतःचे घर भरण्यात व्यस्त आहे. अशा लोकांनी नरकात जावे.” अशी सडकून टीका तिने नाव न घेता केली.