मुंबई : भारतीय युवा क्रिकेट संघाने (१९ वर्षांखालील) आशिया चषक स्पर्धा जिंकत योग्य दिशेने वाटचाल सुरू केली असून आगामी युवा विश्वचषकात भारत चांगली कामगिरी करेल, असा विश्वास संघाचे मुख्य प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकर यांनी व्यक्त केला. 

भारतीय युवा संघाने मागील शुक्रवारी विक्रमी आठव्यांदा आशिया चषकाचे जेतेपद पटकावले.  दुबई येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा नऊ गडी राखून धुव्वा उडवला. ‘‘आमच्या संघाने योग्य दिशेने वाटचाल सुरू केली आहे. बऱ्याच खेळाडूंनी चांगली कामगिरी करत आम्हाला सामने जिंकवून दिले. आम्ही ठरावीक खेळाडूंवर अवलंबून नव्हतो. जेव्हा अधिकाधिक खेळाडू विजयात योगदान देतात, तेव्हा प्रशिक्षक म्हणून तुम्हाला खूप समाधान वाटते. आशिया चषक स्पर्धा सामन्यांच्या सरावासाठी फायदेशीर ठरली,’’ असे कानिटकर म्हणाले.

IND vs BAN Mahmudullah Announces Retirement From T20I Cricket in Press Conference
IND vs BAN: भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी बांगलादेशच्या ‘या’ खेळाडूने टी-२० क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती, पत्रकार परिषदेत केली घोषणा
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
IND Vs BAN India vs Bangladesh 2nd T20 Match Team India Playing XI will change
IND vs BAN : दुसऱ्या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार मोठा बदल, दिल्लीत ‘लोकल बॉय’ करणार पदार्पण?
International Masters League 2024 Updates in Marathi
IML 2024 : सचिन-लारासह ‘हे’ दिग्गज पुन्हा एकदा मैदान गाजवण्यासाठी सज्ज! ‘या’ लीगमध्ये होणार सहभागी
What is equation for Team India in reach the semi finals
Team India : भारताचे उपांत्य फेरीत पोहोचणे ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड सामन्यावर अवलंबून, जाणून घ्या काय आहे समीकरण?
Sri Lanka Cricket Board has appointed Sanath Jayasuriya as the head coach of the Sri Lankan
Sanath Jayasuriya : श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय! जगातील सर्वात स्फोटक फलंदाजाला मुख्य प्रशिक्षक म्हणून केले नियुक्त
batsman jemima rodrigues on t20 world cup
जेतेपदाच्या स्वप्नपूर्तीसाठी परिस्थितीनुसार खेळणे आवश्यक! ट्वेन्टी२० विश्वचषकाबाबत जेमिमाचे मत
T20 World Cup INDW beat WIW by 20 Runs in Womens World Cup Warm Up Match
Women’s T20 World Cup: T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची जोरदार तयारी, पहिल्या सराव सामन्यात वर्ल्ड चॅम्पियनचा केला पराभव; जेमिमा-पूजाची चमकदार कामगिरी

युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा १४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधीत वेस्ट इंडिजमध्ये रंगणार आहे. ‘‘वेस्ट इंडिजमध्ये विलगीकरणाचा कालावधी संपवल्यानंतर आम्ही सरावाला सुरुवात करू. आमचे आधी सराव सामने होणार असून त्यांच्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे,’’ असेही कानिटकर यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राचे खेळाडू चमक दाखवतील!

भारताच्या युवा संघात कौशल तांबे, राजवर्धन हंगर्गेकर आणि विकी ओस्तवाल या महाराष्ट्राच्या तीन खेळाडूंचा समावेश आहे. ते विश्वचषकात आणि भविष्यात चमकदार कामगिरी करतील याची कानिटकर यांना शाश्वती आहे. ‘‘तिघांनीही विविध सामन्यांत चांगला खेळ केला आहे. त्यांच्यात खूप क्षमता असून त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे. ते मेहनत घेत राहतील याची मला खात्री आहे,’’ असे कानिटकर म्हणाले.