भारतीय क्रिकेटमध्ये मुंबईकर खेळाडूंचं मोठं योगदान आहे. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी पासून आताच्या घडीला रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे असे समर्थ खेळाडू मुंबईने भारतीय क्रिकेटला दिले आहेत. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम स्वतःच्या नावावर जमा केले आहेत. न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी असलेल्या रोहित शर्माने धडाकेबाज अर्धशतकी खेळी करत सचिन तेंडुलकरच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे.
Leading run-getters in
Tests: Sachin Tendulkar – 15921
ODIs: Sachin Tendulkar – 18426
T20Is: Rohit Sharma – 2276* – today @ Auckland#NZvInd— Mohandas Menon (@mohanstatsman) February 8, 2019
वन-डे आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सध्या सचिन तेंडुलकरच्या नावावर जमा आहे. वन-डे क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर १५ हजार ९२१, तर कसोटी क्रिकेटमध्ये १८ हजार ४२६ धावा जमा आहेत. रोहित शर्माने दुसऱ्या टी-२० सामन्यात अर्धशतक झळकावत टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. या कामगिरीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताचं आणि पर्यायाने मुंबईच्या खेळाडूंचं वर्चस्व पहायला मिळत आहे.
अवश्य वाचा – IND vs NZ : महेंद्रसिंह धोनीला मागे टाकत रोहित शर्मा षटकारांचा बादशहा
दरम्यान दुसऱ्या सामन्यात रोहितने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही रोहितने धोनीला मागे टाकलं आहे. या मालिकेतला अखेरचा सामना रविवारी होणार आहे. यावेळी भारतीय संघाला वन-डे मालिकेपाठोपाठ टी-२० मालिका जिंकण्याची संधी आलेली आहे.
अवश्य वाचा – IND v NZ : एक वर्ष १०० षटकार, रोहित शर्माची ही आकडेवारी तुम्हालाही थक्क करेल !