सध्या भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असला तरीही २०१९ साली भारतीय संघाच्या पहिल्या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. नवीन वर्षात भारत आपल्या क्रिकेट दौऱ्याची सुरुवात न्यूझीलंडमधून करणार आहे. २३ जानेवारी २०१९ पासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून, यामध्ये भारत ५ वन-डे आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. न्यूझीलंड क्रिकेटने आज भारताच्या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. २०१८ च्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणार आहे, यानंतर अवघ्या काही दिवसांच्या कालावधीमध्येच भारतीय संघाला न्यूझीलंडला रवाना व्हावं लागणार आहे.

असं असेल भारतीय संघाचं न्यूझीलंड दौऱ्याचं वेळापत्रक –

पहिली वन-डे : २३ जानेवारी २०१९ (नेपियर)

दुसरी वन-डे : २६ जानेवारी २०१९ (माऊंट मॉनगनुई)

तिसरी वन-डे : २८ जानेवारी २०१९ (माऊंट मॉनगनुई)

चौथी वन-डे : ३१ जानेवारी २०१९ (हॅमिल्टन)

पाचवी वन-डे : ३ फेब्रुवारी २०१९ (वेलिंग्टन)

—————————————————————-

पहिली टी-२० : ६ फेब्रुवारी २०१९ (वेलिंग्टन)

दुसरी टी-२० : ८ फेब्रुवारी २०१९ (ऑकलंड)

तिसरी टी-२० : १० फेब्रुवारी २०१९ (हॅमिल्टन)

Story img Loader