या वर्षीची आशिया चषक स्पर्धेतील श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील लढत चांगली रोमहर्षक आणि अटीतटीची ठरली. हा सामना जिंकून आशिया चषकावर नाव कोरण्याचे पाकिस्तानचे स्वप्न अपुरेच राहिले. तर दुसरीकडे मोठी धावसंख्या न उभारताही श्रीलंकेने पाकिस्तानवर २३ धावांनी विजय मिळवला आहे. दरम्यान, एकीकडे हा सामना सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. भारतीय असल्यामुळे पाकिस्तान-श्रीलंका सामना पाहण्यास गेलेल्या भारतीय क्रिकेटप्रेमींना स्टेडियममध्ये प्रवेश नाकारण्यात आला. प्रवेश नाकारण्यात आलेल्या भारतीयांनी याबद्दल अधिकची माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>> PAK vs SL Asia Cup 2022 : पाकिस्तानला विजयाने दिली हुलकावणी, २३ धावांनी पराभव; आशिया चषकावर श्रीलंकेनं कोरलं नाव

नेमकं काय घडलं?

श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी काही भारतीय क्रिकेटप्रेमी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये पोहोचले होते. मात्र त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. सामना पाहण्यासाठी जायचे असेल तर तुम्हाला पाकिस्तान किंवा श्रीलंकेची जर्सी परिधान करावी लागेल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर या भारतीय क्रिकेटप्रेमींनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं, याची त्यांनी अधिक माहिती दिली आहे.

हेही वाचा >>>> PAK vs SL Asia Cup 2022 : हे काय? पाकिस्तानी खेळाडूने केले चिटिंग? मैदानातच पंचासोबत…

भारतीय क्रिकेटप्रेमीने व्हिडीओमध्ये काय दावा केला?

“आम्ही दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या बाहेर उभे आहोत. माझ्या मागे तुम्ही हे स्टेडियम पाहू शकता. भारतीय असल्यामुळे आम्हाला या स्टेडियममध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे. हे अतिशय अचंबित करणारे आहे. आम्ही भारतीय जर्सी परिधान केल्यामुळे आम्हाला प्रवेश नाकारण्यात आला. त्यांनी आम्हाला धक्के मारत बाहेर काढलं. आम्ही क्रिकेट पाहण्यासाठी आलो होतो. स्टेडियममध्ये जायचे असेल तर तुम्हाला पाकिस्तान किंवा श्रीलंकेची जर्सी परिधान करावी लागेल, असे आम्हाला सांगण्यात आले. असा नियम त्यांची वेबसाईट किंवा इतर कुठेही दिलेला नाही. स्टेडियम परिसरात आल्यानंतर आम्हाला हे समजले.” असे या व्हिडीओमधील व्यक्तीने सांगितले आहे.

हेही वाचा >>>> PAK vs SL Final Match : तो अवघा १९ वर्षांचा, पण श्रीलंकेच्या दिग्गजाला दाखवलं अस्मान; बघता बघताच दांडी गुल!

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर भारतीयांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पाकिस्तान-श्रीलंका यांच्यातील लढत चांगलीच रोमहर्षक ठरली. या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानसमोर विजयासाठी १७१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र पाकिस्तानचा संघ २० षटकांत फक्त अवघ्या १४७ धावा करू शकला. श्रीलंकेचा या सामन्यात २३ धावांनी विजय झाला.