पोर्ट कॅरस (ग्रीस) येथे सुरु असलेल्या जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाच सुवर्णपदकांसह अकरा पदके जिंकली. भारताच्या एम. महालक्ष्मी (१८ वर्षे मुली), आर. वैशाली (१४ वर्षे मुली), आर.प्रज्ञानंद (१० वर्षे मुले), रक्षिता रवि (१० वर्षे मुली) व भरत सुब्रमण्यम (८ वर्षे मुले) यांनी सुवर्णपदक पटकाविले. हे पाचही खेळाडू चेन्नई येथील ग्रँडमास्टर आर.बी. रमेश यांच्या गुरुकुल अकादमीत सराव करतात. निहाल सरीन (१२ वर्षे), देव शहा (८ वर्षे) व व्ही. वर्षिनी यांना रौप्यपदक मिळाले. वंतिका अगरवाल (१४ वर्षे), सायना सलोनिका (१२ वर्षे) व दिव्या देशमुख (१० वर्षे) यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

Story img Loader