माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू व राष्ट्रीय फुटबॉल संघाचे सहायक प्रशिक्षक सॅव्हिओ मेदेरा यांना कुआलालंपूर येथील चोरांचा फटका बसला. ते वास्तव्यास असलेल्या हॉटेलमधून त्यांच्या पासपोर्टसह काही परदेशी विनिमय चोरीस गेली. मेदेरा यांच्या कुटुंबीयांनी येथे दिलेल्या माहितीनुसार मेदेरा हे सध्या मलेशियात पर्यटनासाठी गेले आहेत. ते पर्यटन करून आपल्या हॉटेलमध्ये आले असताना त्यांचा पासपोर्ट, काही परदेशी विनियम, तसेच काही कागदपत्रे गायब झाली असल्याचे त्यांचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तेथील स्थानिक पोलिसांकडे तक्रार नोंदविली.

Story img Loader