Mohammed Shami’s photo in the guise of husband : एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा मोहम्मद शमी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. विश्वचषकापासून त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. आजकाल, तो सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि त्याच्या चाहत्यांमध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहे. शमीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो वराच्या रुपात दिसत आहे. या लेखात संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया.
पत्नी हसीन जहाँपासून विभक्त झाल्यानंतर तो लवकरच पुन्हा लग्न करेल असा अंदाज त्याचे चाहते बांधत आहेत. त्याने सोशल मीडियावर एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये तो वराच्या रुपात दिसत आहे. त्याचा हा लूक पाहिल्यानंतर चाहते त्याला रंजक प्रश्न विचारत आहेत. एका युजरने त्याला विचारले, “शमी भाई, तू पुन्हा लग्न करणार आहेस का?” तर दुसर्या युजरने लिहिले, “तुम्ही अलादीन, भाईसारखे दिसत आहात.” फोटो पाहून असे वाटते की शमी कोणत्या तरी खास ठिकाणी गेला आहे आणि त्याचे या शैलीत स्वागत करण्यात आले आहे.
मोहम्मद शमीने २०१४ मध्ये हसीन जहाँला दोन वर्षे डेट केल्यानंतर तिच्याशी लग्न केले होते. लग्नापूर्वी हसीन पेशाने चीअरलीडर होती. मात्र, लग्नानंतर तिने हे काम सोडले. लग्नाच्या चार वर्षानंतर हसीनने शमीवर लैंगिक छळ आणि हुंडाबळीचे गंभीर आरोप केले होते. याशिवाय हसीनने त्याच्यावर मॅच फिक्सिंग आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचे गंभीर आरोप केले होते, त्यानंतर दोघेही वेगळे झाले.
हेही वाचा – NZ vs PAK 4th T20 : शिखर धवनने घेतली मोहम्मद रिझवानची मजा, फोटो होतोय व्हायरल
मोहम्मद शमी अर्जुन पुरस्काराने सन्मानित –
२०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत या वेगवान गोलंदाजाने चमकदार कामगिरी केली होती. त्याने ७ सामन्यात १०.७० च्या उत्कृष्ट सरासरीने आणि ५.२६ च्या किफायतशीर इकॉनॉमी रेटने २४ विकेट्स घेतल्या. २०२३ च्या विश्वचषकात टीम इंडियाला अंतिम फेरीत नेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यासाठी जानेवारी २०२४ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.