जगातील पहिले ऑगमेंटेड रिअॅलिटी क्रिकेट एनएफटी प्लॅटफॉर्म – क्रिकफ्लिक्स एनएफटीची भव्य सुरुवात झाली आहे. पहिल्या तासातच एकूण १,८५,०० डॉलर्स (१.३८ कोटी रुपये) इतक्या किमतीच्या वस्तुंची विक्री करण्यात आली. यातूनच भारताच्या पहिल्या विश्वचषक विजयाच्या ट्रॉफीची प्रतिकृती (१९८३) १,१०,००० डॉलर्स म्हणजेच सुमारे ८२ लाख रुपयांना विकली गेली. याशिवाय कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा श्रीलंकेचा महान ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरनच्या शेवटच्या कसोटी सामन्यातील चेंडूचाही लाखो रुपयांना लिलाव झाला.

खलीज टाइम्सच्या वृत्तानुसार, १९८३ च्या विश्वचषक ट्रॉफीची प्रतिकृती एहसान मोरावेझ नावाच्या व्यक्तीने खरेदी केली. ही ट्रॉफी चांदीची बनलेली होती आणि हिऱ्यांव्यतिरिक्त अनेक मौल्यवान रत्नेही त्याला जोडलेली होती. त्याचवेळी, मुरलीधरनच्या शेवटच्या कसोटी सामन्यातील चेंडूला ४० हजार डॉलर्स (३० लाख रुपये) इतकी किंमत मिळाली. याशिवाय १९८३ चा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाच्या खेळाडूंनी स्वाक्षरी केलेले टी-शर्ट देखील ५ हजार डॉलर्सची किंमत देऊन खरेदी करण्यात आले.

हेही वाचा – T20 World Cup : स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच पाकिस्तानचं ‘नापाक’ कृत्य; फोटो झाले व्हायरल!

काय आहे क्रिकफ्लिक्स?

त्याचबरोबर २०१६ मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिज संघाची एक बॅटही विकली गेली. या बॅटवर कॅरेबियन संघाच्या खेळाडूंची स्वाक्षरी होती. क्रिकफ्लिक्स हे एक व्यासपीठ आहे, जे कोणत्याही कलाकृती किंवा ऐतिहासिक क्षणांशी संबंधित गोष्टींचे डिजिटल रूपांतरण करते. या गोष्टी डिजिटल रूपात बदलल्यानंतर, ते व्हर्च्युअल रिअॅलिटीद्वारे अगदी वास्तविक सारखे बनवले जातात. यामुळे लाखो एनएफटी चाहत्यांना डिजिटल स्मरणीय क्रिकेटसंबंधी आठवणी साठवण्याची संधी मिळते. वास्तविक, एनएफटी एक प्रकारचे डिजिटल टोकन आहे. ज्याची कॉपी करता येत नाही आणि क्रिप्टोकरन्सीप्रमाणे बदलता येत नाही.

Story img Loader