Nishad Kumar wins gold medal in men’s high jump T-47 final: चीनमधील हांगझोऊ येथे चौथ्या आशियाई पॅरा गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भारतीय तुकडी चमकदार कामगिरी करत आहे. आतापर्यंत भारताने तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि तीन कांस्य पदकांसह एकूण ९ पदके जिंकली आहेत. सोमवार, २३ ऑक्टोबर २०२३ रोजी, भारताच्या निषाद कुमारने पुरुषांच्या उंच उडी टी-४७ प्रकारात २.०२ मीटर अंतर पार करून आशियाई क्रीडा स्पर्धेचा विक्रम मोडला. त्याचबरोबर ऐतिहासिक विजयाची नोंद करून सुवर्णपदक जिंकले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आशियाई पॅरा गेम्स २०२३ मधील भारताची कामगिरी –

भारतीय संघात निषाद कुमार व्यतिरिक्त प्राची यादवने महिला कॅनोइंगमध्ये देशाला पहिले रौप्य पदक मिळवून दिले. याशिवाय शैलेश कुमारने पुरुषांच्या उंच उडी टी-६३ स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले. तसेच मरियप्पन थंगावेलूने रौप्य आणि रामसिंग पडियारने भारताला कांस्यपदक जिंकून दिले. भारताच्या मोनू घनघासने आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या शॉटपुटमध्ये १२.३३ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह कांस्यपदक मिळवून देशाचा गौरव केला. पुरुषांच्या थ्रो बॉलमध्ये प्रणव सुरमा, धरमबीर आणि अमित सिरोहा यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक जिंकले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन –

निषाद कुमारने २.०२ मीटर उंच उडी मारून हा विजय नोंदवला. चीनच्या होंगजी चेनला रौप्य (१.९४ मीटर) मिळाले. भारताच्या राम पालनेही पाचव्या प्रयत्नात १.९४ मीटर अंतर पार करून रौप्यपदक जिंकले. आशियाई पॅरा गेम्समधील भारतीय दलाच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, ते भारतीय क्रीडा भावनेचे खरे सार प्रतिबिंबित करतील.

भारतातील ३०३ खेळाडू १७ खेळांमध्ये झाले आहेत सहभागी –

चौथ्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताने ३०३ खेळाडूंची तुकडी पाठवली आहे. जे आशियाई पॅरा गेम्समध्ये १७ खेळांमध्ये भाग घेत आहेत. २०२० च्या पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या अवनी लखेराने रायफल शूटिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले होते आणि सुमित अंतिलने भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे या वर्षीही त्यांच्याकडून खूप अपेक्षा केल्या जात आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indias nishad kumar wins gold medal in high jump t47 final at asian para games 2023 vbm
Show comments