ODI World Cup 2023 India Squad Team Players List: २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, विश्वचषकात सहभागी होणाऱ्या सर्व देशांना ५ सप्टेंबरपर्यंत त्यांच्या संघाची घोषणा करायची आहे आणि नंतर बदल केले जाऊ शकतात. अशा परिस्थितीत बीसीसीआयने आपला संघ निवडला आहे. आशिया कप २०२३ मधील भारत-पाकिस्तान सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविड आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यात बैठक झाली. यानंतर विश्वचषकाचा संघ निश्चित झाला असला तरी त्याची अधिकृत घोषणा अद्याप व्हायची आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन, वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा आणि युवा तिलक वर्मा यांना विश्वचषक संघात स्थान मिळवता आलेले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनफिट लोकेश राहुल टीमचा भाग आहे. जर तो निर्धारित वेळेत फिट झाला नाही तर त्याच्या जागी संजू सॅमसनची निवड केली जाईल. सॅमसन राखीव खेळाडू म्हणून संघात राहील.

निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी श्रीलंकेत भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांची भेट घेऊन संघाची निवड केली. कँडी येथे भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप सामन्यानंतर ही बैठक झाली. सॅमसनसह तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा यांना विश्वचषक संघात स्थान मिळालेले नाही. संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार असून मधल्या फळीत फलंदाजीसह त्याच्या चमकदार कामगिरीनंतर इशान किशनलाही संघात स्थान मिळाले आहे. कर्णधार शर्माशिवाय शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव हे भारताचे फलंदाज असतील.

हेही वाचा: Gautam Gambhir: “मी नव्हे तर हरभजनने जिंकवली होती मॅच…”, धोनीबाबत गंभीरचा ‘यू-टर्न’; सोशल मीडियावर झाला ट्रोल

अष्टपैलू हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर यांनाही संघात स्थान मिळाले आहे. निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने फलंदाजीच्या सखोलतेवर भर दिला आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज वेगवान आक्रमणाचे नेतृत्व करतील, तर फिरकी गोलंदाज कुलदीप यादवलाही संघात स्थान मिळाले आहे.

निवड समितीने राहुलच्या तंदुरुस्तीवरही चर्चा केली आणि वैद्यकीय संघाच्या ग्रीन सिग्नलनंतर त्याचा संघात समावेश करण्यात आला. राहुल बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये अनेक तास नेटमध्ये सराव करत आहे आणि फलंदाजी करत आहे. आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघात सहभागी होण्यासाठी त्याला लंकेला पाठवण्यात येणार असल्याची माहितीही समोर आली आहे. बीसीसीआयला आपला अंतिम विश्वचषक संघ आयसीसीकडे सादर करण्यासाठी ५ सप्टेंबरची अंतिम मुदत असताना, ४ सप्टेंबरच्या संध्याकाळी निवड समितीची बैठक घ्यायची होती. पण वैद्यकीय पथकाने राहुलला साफ केल्यानंतर एक दिवस वाट पाहण्यात काही अर्थ नाही असे वाटले.

हेही वाचा: IND vs NEP: दुबळ्या नेपाळसमोर टीम इंडियाचे गचाळ क्षेत्ररक्षण; कोहली, श्रेयस, इशान यांनी कॅचेस सोडताच रोहित भडकला; पाहा Video

राहुलच्या उजव्या मांडीवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून गेल्या साडेतीन महिन्यांपासून तो मैदानाबाहेर आहे. काही आठवड्यांपूर्वी पत्रकार परिषदेत आगरकर म्हणाले होते की, “राहुलला दुखापत झाली होती आणि त्यामुळेच बॅकअप पर्याय म्हणून संजू सॅमसनची निवड करण्यात आली आहे. आगरकरने आधीच संकेत दिले होते की निवड समिती आपल्या आशिया चषक १८ सदस्यीय संघातून विश्वचषक संघाची निवड करेल आणि अपेक्षेप्रमाणे कोणतेही मोठे बदल होणार नाहीत.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indias probable world cup team rahul gets a chance sanju samson may be out avw
Show comments