International Beach Tennis Championships थायलँड मधील राजधानी पटाया येथे १८-२२ ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या ITF पटाया ओपन मध्ये भारताच्या उन्नत सांगळे आणि विश्वजीत सांगळे या जोडगोळीने जबरदस्त कामगिरी केली. उन्नत सांगळे आणि विश्वजीत सांगळे ह्या जोडीने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलँडच्या क्रितीकाम हनमोंत्री आणि कासिम वलईसाथेनसिल्पा ह्यांचा २-६ ६-४ १०-६ असा पराभव करत उपांत्य फेरीत मजल मारली. त्यांना जपानच्या अकिरा नाबाता आणि नाओटो तानुका ह्या जोडी कडून ६-२ ६-० असा पराभव स्वीकारावा लागला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या स्पर्धेतील मिश्र दुहेरी मध्ये भारताच्या उन्नत सांगळे आणि थायलँडच्या पेया निचाकर्ण ह्या जोडीने स्पेनच्या जॉर्ज सोलज आणि मार्था मेसेकबॅडो यांच्यावर ४-६, ६-२, ११-९ असा शानदार विजय नोंदवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र, तिथे त्यांना थायलँडच्या जोडी करुन पराभव स्वीकारावा लागला.

हेही वाचा: R. Ashwin: मांकडिंगबाबत आर. अश्विनची सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल; म्हणाले, “क्रीजमध्ये राहा आणि शांतपणे जगा…”

आंतरराष्ट्रीय बीच टेनिस स्पर्धेत वीस हून अधिक देश सहभागी होते. ऑलिंपिक बीच गेममध्ये उत्तम कामगिरी करण्यासाठी उन्नत व विश्वजीत सांगळे सहभागी होणार होते पण या स्पर्धांचे आयोजन ऐनवेळी रद्द झाले. मात्र पुढील आवृत्तीसाठी या आपल्या दोन्ही खेळाडूंची खेळातली कामगिरी पाहता त्यांची भविष्यातील वाटचाल योग्य दिशेने आहे, असे दिसते. भारतासारखे देश यांसारख्या खेळात आपले प्रतिनिधी पाठवत असल्याने युवा खेळाडूंना अशा प्रकारच्या खेळांमध्ये खेळण्याची एक संधी निर्माण होत आहे.

हेही वाचा: Neeraj Chopra Wins Gold: सुवर्णपदक जिंकल्यानंतर ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राची आई झाली भावूक; म्हणाली, “तो देशाचाच मुलगा…”

आंतरराष्ट्रीय बीच टेनिस यासारख्या स्पर्धेत भारताच्या या जोडीच्या स्पर्धांमधील प्रदर्शनामुळे भारताची बीच टेनिस या क्रीडा प्रकारातील आंतरराष्ट्रीय क्रमवारीत सुधारणा होणार हे निश्चित आहे. मात्र, त्यासाठी आपल्याला सातत्याने अशा प्रकारच्या वेगवगळ्या क्रीडा प्रकारांना अधिक प्राधान्य देणे गरजेचे आहे. यातूनच भविष्यातील एक नवी पिढी तयार होईल, जी क्रिकेट व्यतिरिक्त या खेळांकडे वळू शकेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indias run in the international beach tennis championships continues excellent performance by unnat vishwajeet avw
Show comments