भारतीय संघाचा युवा फलंदाज विराट कोहलीचा आज २५वा वाढदिवस. भारताच्या या ‘रन-मशिन’ने अल्पावधीत क्रिकेट जगतात आपली ओळख निर्माण केली आहे. आज विराट कोहली अनेक युवा खेळाडूंचा आदर्श बनला आहे. त्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत एकूण ३४४ धावा करणाऱ्या विराट कोहलीने जागतिक एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीतील फलंदाजांच्या विभागात अग्रस्थानावर झेप घेतली आहे. कोहलीने प्रथमच ही मजल मारली आहे. सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनीनंतर कोहली हा जागतिक फलंदाजीच्या क्रमवारीत प्रथम स्थान मिळवणारा तिसरा खेळाडू ठरला.
या युवा आक्रमक खेळाडूचा वाढदिवसही मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. त्याच्या वाढदिवसाचा फोटो भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून प्रसिद्ध केला आहे. त्याचबरोबर अनेक मान्यवरांनी कोहलीला त्याच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
Happy Birthday Virat Kohli. You’re the best batsman of this generation… after me. Happy 25th B’day #Kohli pic.twitter.com/ZlkIf9UeKt
— Sir Ravindra Jadeja (@SirJadeja) November 4, 2013
Happy Birthday Virat Kohli. Enjoy your BC and MC. I mean Birthday Celebration and Marble Cake. #WhatWereYouThinking
— Ramesh Srivats (@rameshsrivats) November 5, 2013
Happy 25th birthday Virat Kohli. You could make the coveted no 4 Test spot your own for years with rightly directed aggro…
— Cricketwallah (@cricketwallah) November 5, 2013
Happy 25th Birthday Virat Kohli!!!… Many more years of entertainment to come!!!
— Russel Arnold (@RusselArnold69) November 5, 2013