ऑलिम्पिक पदक विजेता भारताचा अव्वल कुस्तीपटू सुशील कुमारला आशियाई स्पर्धेआधी जोरदार झटका बसला आहे. जॉर्जिया येथे सुरु असलेल्या तबिलिसी ग्रॅड प्रीक्स स्पर्धेच्या पहिल्या फेरीतच सुशील कुमारचा पराभव झाला. चार वर्षातील सुशीलचा हा पहिला पराभव आहे. सुशीलचे अन्य दोन सहकारी बजरंग पुनिया आणि दीपक पुनिया यांनी एका बाजूने चांगली कामगिरी करत उपांत्यपूर्वफेरीत प्रवेश केला. सुशील कुमारचा पोलंडच्या आंद्रजेज पियोत्र सोकालस्कीने ४-८ ने पराभव केला. सुशील कु्मार ७४ किलो वजनी गटात खेळत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आशियाई स्पर्धांचा विचार करता सुशील कुमारसाठी हा चांगला निकाल नाहीय. मागच्या महिन्यात झालेल्या चाचणीफेरीमध्ये सुशील कुमार सहभागी झाला नव्हता. त्याची गत कामगिरी आणि फॉर्म पाहून भारतीय कुस्ती महासंघाने त्याला सवलत दिली होती. गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुशील कुमारने तिसरे सुवर्णपदक जिंकले होते.

सुशील कुमारने सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये २००८ आणि २०१२ मध्ये भारताला कांस्य आणि रौप्यपदक मिळवून दिले आहे. बुधवारच्या पराभवाआधी इटलीच्या सासारीमध्ये मे २०१४ साली फ्रान्सच्या लुका लॅम्पिसने त्याला पराभूत केले होते. ६५ किलो फ्रि स्टाइल गटात बजरंगने युक्रेनच्या गोर ओगानेस्यानवर मात केली. उपांत्यपूर्वफेरीत त्याचा सामना इराणच्या योनेस अलियाकबर बरोबर होणार आहे. ८६ किलो वजनी गटात दीपक पुनियाने मोलदोवाच्या जॉर्जी रुबाएववर मात केली. सबा चिखरादजेबरोबर त्यांचा पुढचा सामना होणार आहे.