भारतीय संघाचा न्यूझीलंडचा दौरा जानेवारीत होणार असून, यामध्ये पाच एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. १९ जानेवारीला या दौऱ्याची एकदिवसीय सामन्याने सुरुवात होणार असून अखेरचा कसोटी सामना १८ फेब्रुवारीला होणार आहे.भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) कार्यकारिणीची बैठक झाल्यावर दुसऱ्याच दिवशी न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने पत्रकाद्वारे ही माहिती प्रसिद्ध केली आहे. भारताने दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत अजून काहीही निश्चित केलेले नाही. भारतीय संघ मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्धचे सामने खेळल्यावर न्यूझीलंडच्या दौऱ्यावर रवाना होणार असल्याचे म्हटले जात असून, दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याबाबत कुणीही काहीही बोलायला तयार नाही.
भारताच्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याबाबत आम्हाला काहीही कल्पना नाही, पण आम्ही आमच्या दौऱ्याच्या तारखा बीसीसीआयशी चर्चा करून निश्चित केल्या आहेत. बीसीसीआयच्या कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वीच आम्ही याबाबत चर्चा केली होती आणि त्या वेळी दौऱ्याच्या तारखा निश्चित करण्यात आल्या.
– डेव्हिड व्हाइट, न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी
संग्रहित लेख, दिनांक 3rd Sep 2013 रोजी प्रकाशित
भारताचा न्यूझीलंड दौरा जानेवारीत
भारतीय संघाचा न्यूझीलंडचा दौरा जानेवारीत होणार असून, यामध्ये पाच एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.
First published on: 03-09-2013 at 04:00 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indias tour of new zealand advanced to january