IndiaW vs PakistanW T20 World Cup Match Today, 12 February 2023 Highlights: भारतीय संघाने रविवारी महिला टी२० विश्वचषकातील आपल्या मोहिमेला विजयाने सुरुवात केली. भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होता. केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे हा सामना खेळला गेला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २०षटकांत ४ गडी गमावून १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने १९व्या षटकात तीन विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. जेमिमाह रॉड्रिग्स-रिचा घोषच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिलांनी विश्वचषकातील पहिला विजय नोंदवला अन् पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या. जेमिमाहला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारताला विजयासाठी शेवटच्या तीन षटकात २८ धावांची गरज होती. मात्र, रिचा आणि जेमिमाह यांच्या मनात काही वेगळेच होते. १८व्या षटकात रिचाने सलग तीन चौकार मारत पहिल्या सामन्याचा मार्गच बदलला. यानंतर तीने १९व्या षटकात पुन्हा तीन चौकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. १९व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर जेमिमाहला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी एका धावेची गरज होती. तीने चौकार मारून आपले अर्धशतकही पूर्ण केले आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. जेमिमाहच्या टी२० कारकिर्दीतील हे १०वे अर्धशतक होते. जेमिमाहने ५५ चेंडूत ६८ धावा करत नाबाद राहिली आणि रिचाने २५ चेंडूत ४३ धावा केल्या. जेमिमाहने आपल्या डावात सात चौकार मारले, तर रिचाने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. दोघींमध्ये चौथ्या विकेटसाठी नाबाद ५८ धावांची भागीदारी झाली.
तत्पूर्वी पाकिस्तानने भारतासमोर १५० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानच्या संघाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात दीप्ती शर्माने जावेरिया खानला हरमनप्रीत कौर करवी झेलबाद केले. जावेरियाला सहा चेंडूंत आठ धावा करता आल्या. यानंतर मुनीबा अली आणि कर्णधार बिस्माह मारूफ यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३२ धावांची भागीदारी केली. राधा यादवने ही भागीदारी तोडली. तीने मुनिबाला यष्टिरक्षक रिचा घोषच्या हातून स्टंप आऊट केले. पूजा वस्त्राकरने निदा दारला खातेही उघडू दिले नाही आणि रिचाकडे झेलबाद झाली. सिद्रा अमीन ११ धावा करू शकली आणि राधाकरवी झेलबाद झाली.
यानंतर बिस्माहने आयशासोबत पाचव्या विकेटसाठी ४७ चेंडूत ८१ धावांची नाबाद भागीदारी केली. बिस्माहने ५५ चेंडूत ६८ धावांची नाबाद खेळी खेळली. तीने आपल्या खेळीत सात चौकार मारले. त्याचवेळी आयशाने २५ चेंडूत ४३ धावांची तुफानी खेळी केली. आपल्या खेळीत तीने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. शेवटच्या पाच षटकात पाकिस्तानने ५८ धावा केल्या आणि एकही विकेट गमावली नाही. अशा प्रकारे २० षटकांनंतर पाकिस्तानने ४ गडी गमावून १४९ धावा केल्या. भारताकडून राधा यादवने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. त्याचवेळी पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
India W vs Pakistan W T20 World Cup Highlights Update Score: भारत विरुद्ध पाकिस्तान महिला टी२० विश्वचषक सामना हायलाइट्स अपडेट्स
जेमिमाह रॉड्रिग्स-रिचा घोषच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिलांनी विश्वचषकातील पहिला विजय नोंदवला. पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या.
भारत १५१-३
भारताला १८ चेंडूत २८ धावांची गरज असून ही जोडी टिकून राहणे आवश्यक आहे. सामना रोमांचक स्थितीत आला आहे.
भारत १२२-३
मोठे फटके मारण्याच्या नादात यष्टीरक्षक रिचा घोष बाद झाली होती मात्र रिव्ह्यू घेतल्यानंतर त्यात कळले की चेंडू ग्लोव्हजला लागला होता आणि त्यात ती नाबाद ठरली.
भारत १०९-३
शफाली वर्मा बाद झाल्यानंतर जेमिमाह रॉड्रिग्स-हरमनप्रीत जोडीने भारताचा डाव सावरला होता त्यांच्यात २८ धावांची भागीदारी झाली होती पण ती फोडण्यात नशरा संधूला फोडण्यात यश आले. कर्णधार हरमनप्रीत कौर १६ धावा करून बाद झाली.
भारत ९३-३
T20 WC 2023. WICKET! 13.3: Harmanpreet Kaur 16(12) ct Bismah Maroof b Nashra Sundhu, India Women 93/3 https://t.co/OyRDtC9SWK #INDvPAK #T20WorldCup
— BCCI Women (@BCCIWomen) February 12, 2023
नशरा संधूच्या गोलंदाजीवर जेमिमाह रॉड्रिग्स यष्टीचीत होता होता वाचली. भारताला मोठ्या भागीदारीची गरज असून कर्णधार हरमनप्रीत कौरने धावा करणे गरजेचे आहे.
भारत ७३-२
Looks like I'm now part of Elite Company ? pic.twitter.com/EkLJq7BaZF
— Jemimah Rodrigues (@JemiRodrigues) August 16, 2022
अंडर-१९ वर्ल्डकप विजेती शफाली वर्मा बाद झाली असून हा भारताला मोठा धक्का बसला आहे. तिने २५ चेंडूत ३३ धावा करून बाद झाली. नशरा संधूने बाद करत सिद्रा अमीनने अफलातून झेल घेतला.
भारत ६५-२
पाकिस्तानने ठेवलेल्या १५० धावांचा पाठलाग करताना भारताची चांगली सुरुवात झाली होती. मात्र यास्तिका भाटिया मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाली. तिने १७ धावा केल्या आणि तिला सादिया इक्बालने झेलबाद केले.
भारत ३८-१
T20 WC 2023. WICKET! 5.3: Yastika Bhatia 17(20) ct Fatima Sana b Sadia Iqbal, India Women 38/1 https://t.co/OyRDtC9SWK #INDvPAK #T20WorldCup

सादियाच्या षटकात भारताची सलामीवीर शफाली वर्मा विरुद्ध पायचीतचे अपील केले असता अंपायरने बाद दिले होते मात्र तिने रिव्ह्यू घेत बॉल ट्रॅकिंगमध्ये ती नाबाद ठरली आणि सगळ्यांच्या जीवात जीव आला.
भारत २७-०
सलामीवीर यास्तिका भाटियाने अप्रतिम चौकार मारत चांगली सुरुवात केली. भारताला ती टिकवून ठेवणे गरजेचे आहे.
भारत ५-०
पाकिस्तानने कर्णधार बिस्माह मारुफने शानदार अर्धशतक करत संघाला १४९ पर्यत नेऊन ठेवले. आता भारताला विजयासाठी १५० धावा करायच्या असून कशी सुरुवात करतो ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
पाकिस्तान १४९-४
एका बाजूला पाकिस्तान मोठे फटके मारत असताना आज भारतीय खेळाडूंनी गचाळ क्षेत्ररक्षण करत त्याच्या धावसंख्येत भर घातली असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. आयशा नसीमचा झेल सोडत राधा यादव टीकेचा धनी होत आहे. पुढच्याच चेंडूवर हरलीनने झेल सोडला.
पाकिस्तान १४५-४
रेणुका ठाकूरने १६व्या षटकात १८ धावा कुटल्या. आयशा नसीम आणि बिस्माह मारूफ यांनी आधीच पाचव्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली आहे. आयशा ३३ धावा आणि बिस्माह मारूफने ४५चेंडूत ५० धावा करून फलंदाजी करत आहे. त्याच षटकापासून मोमेंटम पाकिस्तानकडे शिफ्ट झाला.
पाकिस्तान १२९-४
कर्णधार बिस्माह मारुफने एक बाजू लावून धरत शानदार अर्धशतक झळकावले. ४५ चेंडूत ५० धावा करत खेळपट्टीवर टिकून आहे. तिला आयशा नसीम ३३ धावा करून साथ देत आहे.
पाकिस्तान १२०-४
आयशा नसीम आणि कर्णधार मारुफ यांनी शेवटच्या काही षटकात शानदार फटकेबाजीला सुरुवात केली असून भारताला विकेट्सची गरज आहे. लवकरात लवकर विकेट्स काढल्या नाहीत तर ह्या धावा महागात पडू शकतात.
पाकिस्तान १०६-३
पाकिस्तानला चौथा धक्का बसला असून सिद्रा अमीनला ११ धावांवर राधा यादवने रिचा घोषकरवी झेलबाद केले. एका बाजूने कर्णधार बिस्माह मारुफ तंबू ठोकून उभी आहे.
पाकिस्तान ६८-४
T20 WC 2023. WICKET! 12.1: Sidra Ameen 11(18) ct Richa Ghosh b Radha Yadav, Pakistan Women 68/4 https://t.co/OyRDtC9SWK #INDvPAK #T20WorldCup

तीन विकेट्स लवकर पडल्यानंतर पाकिस्तानने डाव सावरला आहे. कर्णधार बिस्माह मारुफने एक बाजू लावून धरली असून एक-दोन धावा करत धावफलक हलता ठेवला आहे.
पाकिस्तान ५८-३
पाकिस्तानला तिसरा धक्का बसला असून भारताची वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकारने निदा दारला भोपळाही फोडू दिला नाही. एका बाजूला मारुफ अजूनही खेळपट्टीवर टिकून आहे. भारताची यष्टीरक्षक रिचा घोषने शानदार रिव्ह्यू घेतला.
पाकिस्तान ४३-३
T20 WC 2023. WICKET! 7.3: Nida Dar 0(2) ct Richa Ghosh b Pooja Vastrakar, Pakistan Women 43/3 https://t.co/OyRDtC9SWK #INDvPAK #T20WorldCup

राधा यादवला धोकादायक जोडी फोडण्यात यश आले. तिने मुनीबा अलीला १२ धावांवर यष्टिचीत करत पाकिस्तानला दुसरा धक्का दिला.
पाकिस्तान ४२-२
T20 WC 2023. WICKET! 6.5: Muneeba Ali 12(14) st Richa Ghosh b Radha Yadav, Pakistan Women 42/2 https://t.co/OyRDtC9SWK #INDvPAK #T20WorldCup

पहिल्या पॉवर प्ले मध्ये पाकिस्तानची सावध सुरुवात झाली असून कर्णधार बिस्माह मारुफ आक्रमक फलंदाजी करताना दिसत आहे. मात्र मुनीबा मात्र संथ खेळताना दिसत आहे. त्यात भारताचे ढिसाळ क्षेत्ररक्षण, ओवर थ्रो यामुळे अधिक धावा देत आहे.
पाकिस्तान ३९-१
टीम इंडियाचे आजच्या सामन्यात ढिसाळ क्षेत्ररक्षण दिसत असून जेवढे कमी धावा देईल तेवढे चांगले आहे. कारण नंतर धावांचा पाठलाग करताना फारसे सोपे नसणार आहे. पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मारुफने आक्रमक सुरुवात करत गोलंदाजांवर दबाव टाकत आहेत.
पाकिस्तान २४-१
सामन्याच्या दुसऱ्याच षटकात दीप्ती शर्माने जवेरिया खानला कर्णधार हरमनप्रीतकरवी झेलबाद केले. तिने केवळ ६ चेंडूत ८ धावा केल्या.
पाकिस्तान १०-१
T20 WC 2023. WICKET! 1.4: Javeria Wadood 8(6) ct Harmanpreet Kaur b Deepti Sharma, Pakistan Women 10/1 https://t.co/OyRDtC9SWK #INDvPAK #T20WorldCup

पाकिस्तानचे सलामीवीर मुनीबा अली आणि जवेरिया खान खेळपट्टीवर मैदानात आले आहेत. भारताकडून रेणुका ठाकूर गोलंदाजीला सुरुवात करणार आहे.
पाकिस्तान ०-०
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघाचे खेळाडू राष्ट्रगीतासाठी मैदानात आले आहेत.
भारताची फलंदाजी हरमनप्रीतवर अवलंबून आहे. या दोघींना अंडर-१९ महिला टी२० विश्वचषक विजेती कर्णधार शफाली वर्माकडून चांगल्या पाठिंब्याची अपेक्षा असेल. जेमिमाह रॉड्रिग्जवर दडपण असेल कारण ती अलीकडच्या काळात चांगली कामगिरी करत नाहीये. त्याचबरोबर वेगवान गोलंदाजी अष्टपैलू पूजा वस्त्राकरची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. रिचा घोष ही अशी खेळाडू आहे जी डेथ ओव्हर्समध्ये संघासाठी झटपट धावा करू शकते.
“दुनिया जीत लो” असे म्हणत भारताची महिला स्टार मिताली राज ने शुभेच्छा दिल्या आहेत. मागील टी२० विश्वचषकात भारताकडून सर्वात चांगले प्रदर्शन तिने केले होते.
.@M_Raj03 expresses her faith in the talent and capabilities of the #WomenInBlue?
— Star Sports (@StarSportsIndia) February 12, 2023
Tune-in to #INDvPAK in the #T20WorldCup
Today | 6 PM | Star Sports and Disney+Hotstar#BlueKnowsNoGender pic.twitter.com/Pto6C0iMMy
पाकिस्तान पूर्ण ताकदीनिशी या सामन्यात उतरणार हे त्याच्या अंतिम अकरा खेळाडूंवरून दिसून येते.
भारताची धडाकेबाज सलामीवीर स्मृती मंधाना दुखापतग्रस्त असल्याने आजच्या सामन्यात खेळणार नाही.
पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मारुफने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
ICC Women's T20 WC 2023. PAKISTAN won the toss and elected to Bat. https://t.co/OyRDtC9SWK #INDvPAK #T20WorldCup

भारतीय महिला क्रिकेट संघ आज कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे आपल्या मोहिमेला सुरुवात करेन. त्यासाठी सर्व संघ मैदानात पोहचला असून सराव करत आहे.
It's Match Day! ??

Hello from Newlands, Cape Town ?#TeamIndia ?? are all set for their opening encounter of the #T20WorldCup as they take on Pakistan ?? pic.twitter.com/Xql0hHj9ht
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना न्यूलँड्स, केपटाऊन येथे होणार आहे. न्यूलँड्सची खेळपट्टी गोलंदाजांपेक्षा फलंदाजांना अधिक मदत करते. या खेळपट्टीवर झालेल्या शेवटच्या ५ महिला टी२० सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ३ सामने जिंकले आहेत तर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने २ सामने जिंकले असून ह्या ठिकाणी मोठी धावसंख्या जास्त होतात.
या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची सरासरी धावसंख्या १२९ धावांची आहे. गेल्या ५ सामन्यांमध्ये या खेळपट्टीवर दोनदा १५० किंवा त्याहून अधिक धावा झाल्या आहेत. महिला क्रिकेटच्या दृष्टीने ही चांगली धावसंख्या आहे. या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकल्यानंतर संघाला प्रथम गोलंदाजी करणे आवडते.

भारतीय संघाने रविवारी महिला टी२० विश्वचषकातील आपल्या मोहिमेला विजयाने सुरुवात केली. भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होता. केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे हा सामना खेळला गेला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ गडी गमावून १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने १९ व्या षटकात तीन गडी गमावून लक्ष्य गाठले.