जकार्ता : जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावरील लक्ष्य सेनचे इंडोनेशिया बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान बुधवारी पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. भारतीय सहकारी एचएस प्रणॉयने त्याला नामोहरम केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुरुष एकेरीच्या ३४ मिनिटे चाललेल्या सामन्यात लक्ष्यने प्रणॉयकडून १०-२१, ९-२१ असा पराभव पत्करला. यंदाच्या हंगामात २० वर्षीय लक्ष्यने ‘सुपर ५००’ दर्जाचे जेतेपद, प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड स्पर्धेची अंतिम फेरी आणि थॉमस चषक स्पर्धेचे सांघिक विजेतेपद अशी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. प्रणॉयने लक्ष्यविरुद्धच्या तिसऱ्या लढतीत प्रथमच विजय मिळवला आहे.

पुरुष दुहेरीत एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला जोडीने जपानच्या केलिचिरो मात्सुई आणि योशिनोरी ताकेउन्शी जोडीला २७-२५, १८-२५, २१-१९ असे नामोहरम केले. महिला दुहेरीत अश्विनी भट आणि शिखा गौतम जोडीने चीनच्या झँग शू शिआन आणि झेंग यू जोडीकडून २८ मिनिटांत ९-२१, १०-२१ अशी हार पत्करली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indonesia badminton tournament pranoy ends goal challenge ysh
First published on: 16-06-2022 at 00:02 IST