Rohit Sharma on Ishan Kishan: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी २०२३चा चौथा आणि अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा सहकारी खेळाडू इशान किशनला मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ड्रिंक्स ब्रेक दरम्यान ही घटना घडली.

रोहितने गमतीत इशान किशनला मारण्याचा प्रयत्न केला

सहकारी खेळाडूंना पाणी पाजणारा इशान किशन १२वा खेळाडू म्हणून मैदानात उतरला. जेव्हा तो धावत सुटतो तेव्हा रोहित शर्माने त्याला पाण्याची बाटली दिली, पण ही बाटली किशनच्या हातून जमिनीवर पडली. इशान किशन बाटली उचलण्यासाठी खाली वाकतो तेव्हा रोहितने त्याला चेष्टा मस्करीत कानाखाली मारण्याचा प्रयत्न केला. जरी त्याने हे विनोदाने केले असले तरी चाहत्यांना कर्णधाराची ही कृती आवडलेली नाही. रोहितला कॅमेरावर सहकारी खेळाडूंवर राग काढण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही रोहितचे असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत.

Suryakumar Yadav Speech in dressing room video
Suryakumar Yadav : ‘आता सगळ्यांनी मायदेशात जाऊन…’, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकल्यानंतर सूर्याने संघाला दिला महत्त्वाचा सल्ला
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
Virat Kohli and Yashavi Jaiswal dominated Australian newspaper front pages
Virat Kohli : ‘नव्या युगाचा मुकाबला…’, विराट-यशस्वी ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर झळकल्याने चाहत्यांचे वेधले लक्ष, PHOTOS व्हायरल
Suryakumar Yadav video with Pakistani fan goes viral :
Suryakumar Yadav : तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, ‘हे आमच्या…’
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
Australia A beat India A by 6 Wickets in in 2nd unofficial Test
IND A vs AUS A : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारताची उडाली दाणादाण, दुसऱ्या सराव सामन्यातही हार
KL Rahul Odd Dismissal Video Goes Viral He Gets Bowled Out Between his Legs in India vs Australia A
KL Rahul Wicket Video: असं कोण आऊट होतं??? राहुलची विकेट पाहून चक्रावून जाल, नेमका कसा झाला क्लिन बोल्ड, पाहा व्हीडिओ

युवा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनने परत येऊन बाटली उचलली. त्याचवेळी रोहित शर्माने मजेशीर पद्धतीने मारण्यासाठी हात वर केला. मात्र तोपर्यंत इशान बाटली घेऊन पळून गेला होता. याआधीही रोहितने असे अनेकदा केले आहे. सप्टेंबरमध्येच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेदरम्यान रोहितने यष्टिरक्षक दिनेश कार्तिकचा लाडाने गळा पकडला होता.

सामन्यात काय घडले?

दुसऱ्या दिवशी जवळपास एक तास उलटून गेला असून भारतीय संघाला आज कुठल्याही परिस्थितीत सामना जिंकण्यासाठी लवकर बाद करणे गरजेचे आहे. आतापर्यंतच्या १७ षटकांत भारतीय संघाला एकही विकेट घेता आलेला नाही. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या सध्या चार विकेट्सवर ३०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. कॅमेरून ग्रीन ६५ आणि उस्मान ख्वाजा १२९ धावा करून फलंदाजी करत आहे. आतापर्यंत दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी १२६ धावांची भागीदारी झाली आहे.

हेही वाचा: Hardik Pandya:  सूर्यकुमार यादवला झटका? WTC फायनलपूर्वी हार्दिक पांड्याच्या कसोटी पुनरागमनावर BCCI करणार चर्चा

तत्पूर्वी, अहमदाबादच्या सपाट खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. हेड आणि ख्वाजा यांनी पहिल्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. यानंतर हेड (३२) आणि लाबुशेन (३) बाद झाले, पण स्मिथने ख्वाजासोबत मोठी भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला चांगल्या स्थितीत आणले. स्मिथला (३८) अर्धशतक झळकावता आले नाही आणि त्याच्या पाठोपाठ आलेला पीटर हँड्सकॉम्ब (१७)ही छोट्या धावसंख्येवर तंबूत परतला. मात्र, यानंतर ग्रीन आणि ख्वाजा यांनी एकही विकेट पडू दिली नाही. दरम्यान, ख्वाजानेही आपले शतक पूर्ण केले. त्याच वेळी, ग्रीन अर्धशतकाच्या जवळ आहे. भारताकडून शमीने दोन आणि अश्विन-जडेजाने प्रत्येकी एक विकेट घेतली.