INDW vs AUSW 3rd ODI Highlights: भारत वि ऑस्ट्रेलिया महिला संघाच्या मालिकेतील तिसऱ्या वनडे सामन्यात भारताच्या अरूंधती रेड्डीने भेदक गोलंदाजी केली. भारतीय संघाने पहिल्या दोन्ही सामन्यात अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नव्हती आणि परिणामी दोन्ही सामन्यांमध्ये संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. यासह ऑस्ट्रेलियाने ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी मिळवली. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासाठी संघात बदल करण्यात आला. प्लेईंग इलेव्हनमध्ये वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डीचा समावेश करण्यात आला आणि तिने तिची निवड पूर्णपणे योग्य असल्याचे सिद्ध केले आणि गोलंदाजीमध्ये असा पराक्रम केला की आजपर्यंत भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासातील एकही गोलंदाज एकदिवसीय क्रिकेटमध्ये करू शकला नव्हता.
अरुंधती रेड्डीने गोलंदाजीला सुरूवात करेपर्यंत ऑस्ट्रेलियन संघाने एकही विकेट न गमावता ५० धावा केल्या होत्या. यानंतर रेड्डीने आधी जॉर्जिया वोलला क्लीन बोल्ड केलं आणि त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियन संघाला आणखी तीन धक्के दिले. रेड्डीने फोबी लिचफिल्ड, बेथ मुनी आणि एलिस पेरी यांनाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यासह अरुंधतीने ऑस्ट्रेलियन महिला संघाच्या चार टॉप-४ खेळाडूंच्या विकेट घेतल्या.
अरुंधती रेड्डी ही महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील चौथी गोलंदाज ठरली आहे, जिने एकाच सामन्यात विरोधी संघाच्या टॉप ४ खेळाडूंच्या विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय अरुंधती ही कामगिरी करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू आहे.
महिला वनडे इतिहासातील एका सामन्यात टॉप-४ फलंदाजांना बाद करणाऱ्या गोलंदाज
मार्सिया लेटसोलो – वि नेदरलँड्स (पोचेफस्ट्रूम, २०१०)
कॅथरीन सायव्हर ब्रंट – विरुद्ध भारत (मुंबई, २०१९)
एलिस पेरी – विरुद्ध इंग्लंड (कँटरबरी, २०१९)
केट क्रॉस – विरुद्ध भारत (लंडन, २०२२)
अरुंधती रेड्डी – विरुद्ध ऑस्ट्रेलिया (पर्थ, २०२४)
हेही वाचा – १३७ चेंडूत २०० धावा! भारताच्या लेकीने घडवला इतिहास; सर्वात कमी वयात द्विशतक झळकावणारी पहिली महिला फलंदाज
अरुंधती रेड्डीला भारतीय महिला संघाकडून २०१८ मध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये तिने एक टी-२० सामना खेळला. तेव्हापासून रेड्डीने ३३ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तिने २८ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय तिने आतापर्यंत ५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ८ विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा – Cricketers Retired in 2024: भारताचे ९ तर जगातील १४ क्रिकेटपटूंनी २०२४ मध्ये घेतली निवृत्ती, एकाच क्लिकवर पाहा संपूर्ण यादी
Simply ????ow! ?
— Star Sports (@StarSportsIndia) December 11, 2024
Phoebe Litchfield ☝
Georgia Voll ☝
Ellyse Perry ☝
Beth Mooney ☝#ArundhatiReddy is on fire against the Aussies in the 3rd ODI as she picks up 4 big wickets! ?
? #AUSWvINDWOnStar 3rd ODI ? LIVE NOW on Star Sports Network! pic.twitter.com/bXYwR46pbp
सुरूवातीचे झटपट विकेट गेल्यानंतरही ऑस्ट्रेलियाने मोठी धावसंख्या उभारली आणि भारताला २९९ धावांचे आव्हान दिले आहे. एनाबेल सदरलँड हिने शतक झळकावत संघाच्या धावांमध्ये भर घातली. सदरलँडने ८५ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांसह ११० धावा केल्या आहेत. तर भारताकडून अरूंधती रेड्डीने ४ आणि दीप्ती शर्माने १ विकेट मिळवली.