India W vs Australia W 1st Test: भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार, हरमनप्रीत कौरने गोलंदाजीचे आघाडीचे नेतृत्व केले आणि दिवसअखेरीस दोन महत्त्वपूर्ण विकेट्स घेऊन मुंबईतील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटीत टीम इंडियाला आघाडी मिळवून दिली. हरमनप्रीत कौरने विरोधी संघाची कर्णधार अ‍ॅलिसा हिलीलाही बाद केले, त्यानंतर दोघींमध्ये शाब्दिक चकमक झाली यामुळे सामन्यात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ताहिला मॅकग्राला बाद केल्यानंतर हरमनप्रीतला तिची गोलंदाजीची लय सापडली आणि शानदार गोलंदाजी करत असल्याचे त्यावेळी दिसून आले. तिच्या एका चेंडूवर हीलीने चेंडू सरळ हरमनप्रीतच्या दिशेने मारला आणि भारतीय कर्णधाराने पटकन चेंडू स्ट्रायकरच्या दिशेन थ्रो केला मात्र, तो थेट फलंदाजाला लागला. अ‍ॅलिसा हिलीने तो थ्रो आपल्या दिशेने येत आहे आणि त्यामुळे आपल्याला कुठलीही इजा होऊ नये यासाठी तिने तिच्या बॅटची ढाल म्हणून वापर केला आणि चेंडू थर्ड मॅन बाऊंड्रीकडे गेला. हरमनप्रीत कौरने क्षेत्ररक्षणात फलंदाजाने हस्तक्षेप केला आहे असे अपील केले, परंतु तिला ओव्हरथ्रोमध्ये चार धावा देण्यात आल्या. यामुळे दोघींमध्ये शाब्दिक चकमक झाली.

हरमनप्रीतच्या त्याच षटकातील पुढच्याच चेंडूवर, हीलीने धाडसी स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण तो शॉट ती हुकली आणि बॅटशी चेंडूचा संपर्क झाला नाही. तो चेंडू तिच्या पॅडला लागला आणि अंपायरने तिला एलबीडब्ल्यू बाद म्हणून घोषित केले. यावेळी हरमनप्रीत खूश होती, तिने अ‍ॅलिसा हिलीकडे नजर रोखून पाहिले. अ‍ॅलिसा ड्रेसिंगरूममध्ये परतत असताना हरमनने खूप मोठा तिच्याकडे पाहून जल्लोष देखील केला. यामुळे सामन्यात काही काळ तणावाचे वातावरण होते.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघांमध्ये एकमेव कसोटी सामना खेळला जात आहे. रविवारी (२४ डिसेंबर) सामन्याचा चौथा दिवस आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ५ बाद २३३ धावा केल्या होत्या. त्याच्याकडे ४६ धावांची आघाडी होती. कांगारूंचा संघ चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात २६१ धावांवर बाद झाला. त्याला एकूण ७४ धावांची आघाडी मिळाली. त्यामुळे भारताला विजयासाठी ७५ धावांचे लक्ष्य मिळाले. भारताने दुसऱ्या डावात फलंदाजीला सुरुवात केली.

हेही वाचा: IND vs SA: पायाला पट्टी बांधून वॉकरच्या साहाय्याने चालताना दिसला सूर्यकुमार, मैदानात पुनरागमन करण्याबाबत म्हणाला, “हे सर्वकाही…”

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव असा होता

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात ताहिला मॅकग्रा ७३ धावा करून बाद झाला, अ‍ॅलिस पॅरी ४५ आणि बेथ मुनी ३३ धावा करून बाद झाल्या. अ‍ॅलिसा हिलीने ३२ आणि फोबी लिचफिल्डने १८ धावा केल्या. कांगारू संघाला खेळाच्या चौथ्या दिवशी पहिला धक्का अ‍ॅशले गार्डनरच्या रूपाने बसला. २७ चेंडूत ७ धावा करून ती बाद झाली. पूजा वस्त्राकरच्या चेंडूवर ती पायचीत झाली. तिच्यानंतर अ‍ॅनाबेल सदरलँड २७ धावा करून स्नेह राणाची शिकार झाली. त्यानंतर स्नेहने एलाना किंगला (०) क्लीन बोल्ड केले. राजेश्वरी गायकवाडने लॉरेन चीटलला (४ धावा) बाद करून ऑस्ट्रेलियाला नववा धक्का दिला. गायकवाडने अ‍ॅशले गार्डनरला (९ धावा) बाद करून ऑस्ट्रेलियाचा डाव संपवला. भारताकडून स्नेह राणाने दुसऱ्या डावात चार विकेट्स घेतल्या. राजेश्वरी गायकवाड आणि हरमनप्रीत कौर यांना प्रत्येकी दोन विकेट्स घेण्यात यश मिळाले. पूजा वस्त्राकरने एक विकेट घेत संघाला मदत केली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indw vs ausw heated argument between harmanpreet kaur and alyssa healy watch video avw