Women’s T20 World Cup 2023 Semifinal:आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळला गेला. न्यूलँड्स येथील केप टाउन स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ५ धावांनी विजय मिळवला. भारतीय महिला क्रिकेट संघाचे टी-२० विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. त्याचबबरोबर ऑस्ट्रेलियाने मोठ्या दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली. ऑस्ट्रेलियन संघाकडून बेथ मूनीने सर्वाधिक ५४ धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर मेग लॅनिंग नाबाद ४९ धावांचे योगदान दिले.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ४ बाद १७२ धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघाला १७३ धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघ २० षटकांत ८ बाद १६७ धावाच करु शकला. टीम इंडियाने मेग लॅनिंग आणि बेथ मुनी यांचे सोपे झेल गमावले. त्याचा परिणाम असा झाला की मुनी आणि लॅनिंगने मोठी खेळी खेळली. मुनीने ३७ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. याशिवाय लॅनिंगने कर्णधारपदाची खेळी खेळताना ३४ चेंडूत नाबाद ४९ धावा केल्या. ऍशले गार्डनरने १८ चेंडूत ३१ धावांची खेळी खेळली.

AUS vs PAK Match Updates Australia vs Pakistan 1st ODI
AUS vs PAK : पाकिस्तानची झुंज अपयशी, अखेरीस ऑस्ट्रेलियाने पहिल्या वनडेत मिळवला रोमहर्षक विजय
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
IND vs NZ Anil Kumble Lashes Out At Rohit Sharma and Gautam Gambhir
IND vs NZ : ‘तुम्ही फलंदाजांना दोष देऊ नका…’, मालिका गमावल्यानंतर अनिल कुंबळे रोहित-गौतमवर संतापले
IND vs NZ Harbhajan Singh Statement
IND vs NZ : ‘भारतासाठी ‘ती’ गोष्ट शत्रू ठरतेय…’, मायदेशात पहिल्यांदाच कसोटीत व्हाइट वॉश झाल्यानंतर हरभजन सिंगचे मोठे वक्तव्य
IND vs NZ Five Reasons for India Defeat
IND vs NZ : भारतीय संघावर का ओढवली मायदेशात मालिका पराभवाची नामुष्की?
IND vs NZ India suffered their first-ever home series whitewash in a three-match Test series, losing the third Test at the Wankhede Stadium in Mumbai by 25 runs on Sunday
IND vs NZ : टीम इंडियाचा सलग तिसऱ्या सामन्यात लाजिरवाणा पराभव! न्यूझीलंडने व्हाइट वॉश करत भारतात घडवला इतिहास
Mukesh Kumar sensational 6 for 46 helps India A bowl Australia A out for 195 Runs INDA vs AUSA
INDA vs AUSA: मुकेश कुमारने ६ विकेट्स घेत केला कहर, ऑस्ट्रेलिया अ १९५ वर ऑलआऊट; भारतीय अ संघाने दुसऱ्या दिवशीच घेतला बदला
WTC Points Table Changed After South Africa Test Series Win Over Bangladesh Blow to New Zealand India
WTC Points Table: दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने WTC च्या गुणतालिकेत बदल, न्यूझीलंड संघाला बसला फटका तर टीम इंडिया टेन्शनमध्ये

प्रत्युत्तरात भारतीय संघाला २० षटकांत आठ गडी गमावून १६७ धावा करता आल्या. एका टप्प्यावर भारताने १४ षटकांत ४ गडी गमावून १२४ धावा केल्या होत्या. त्यानंतर टीम इंडियाला ३६ चेंडूत ४९ धावांची गरज होती. भारतीय संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. कर्णधार हरमनप्रीत कौर ३० चेंडूत ४३ आणि ऋचा घोषने १४ धावा केल्या.

यानंतर पुढील षटकात हरमनप्रीतने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्याच षटकात ती विचित्र पद्धतीने धावबाद झाली. हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. एक धाव घेतल्यानंतर दुसरी धाव घेताना ती बॅट क्रीजमध्ये ठेवायला विसरली. तिला ३४ चेंडूत ५२ धावा करता आल्या.हरमनप्रीत बाद होताच पुढच्याच षटकात खराब शॉट खेळून रिचाही बाद झाली.

१९व्या षटकात स्नेह राणा बाद झाल्याने भारताच्या आशा संपुष्टात आल्या. शेवटच्या षटकात विजयासाठी १६ धावांची गरज होती. त्यानंतर दीप्ती शर्मा आणि राधा यादव क्रीजवर होते. मात्र, टीम इंडियाला केवळ १० धावा करता आल्या आणि पाच धावांनी सामना गमवावा लागला. हरमनप्रीतशिवाय जेमिमाने २४ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. शफाली वर्मा, स्मृती मंधाना आणि यास्तिका भाटिया या स्टार्स अपयशी ठरल्या. ऍशले गार्डनरने दोन बळी घेतले. तिला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.