Bangladesh beat India by 3 wickets: बांगलादेश आणि भारत यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात यजमान बांगलादेश संघाने ४ गडी राखून विजय मिळवला. या विजयाने त्यानी आपली लाज राखली आहे. कारण टीम इंडियाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून मालिका आपल्या ताब्यात जिंकली होती.टीम इंडियाने तिसरा सामनाही जिंकला असता, तर बांगलादेशने घरच्या मैदानावर क्लीन स्वीप स्वीकारावा लागला असता. मात्र शमीमा सुलतानची उत्कृष्ट फलंदाजी आणि रुबिया खानच्या गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशने तिसरा टी-२० सामना जिंकला.
हरमनप्रीत कौरची खेळी ठरली व्यर्थ –
टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम खेळताना भारताने २० षटकांत ९ गडी गमावून १०२ धावा केल्या. टीम इंडियासाठी कर्णधार हरमनप्रीत कौरने ४१ चेंडूत ४० धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. तिच्याशिवाय जेमिमाने २८ धावांचे योगदान दिले. या दोन खेळाडूंशिवाय एकही फलंदाज क्रीजवर टिकू शकला नाही.
शमीमा सुलतानने बांगलादेशसाठी खेळली मॅच विनिंग इनिंग –
बांगलादेश संघाने सर्वप्रथम नेत्रदीपक गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्यानंतर सुरेख फलंदाजी करताना १९.२ षटकांत ६ गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. बांगलादेशकडून शमिमा सुलतानने ४६ चेंडूत ४२ धावांची शानदार खेळी केली. ती सलामीवीर म्हणून मैदानात उतरली होती. तिच्याशिवाय कर्णधार निगार सुलतानने १४ आणि सुलताना खातूनने १२ धावांचे योगदान दिले.
भारताने २-१ अशा फरकाने मालिका जिंकली –
पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने ७ विकेट्सने विजय मिळवला. कर्णधार हरमनप्रीत कौर या सामन्यात भारताच्या विजयाची हिरो ठरली , तिने ५४ धावांची शानदार खेळी केली. दुसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने ८ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताकडून दीप्ती शर्माने चांगली कामगिरी केली. तिने १० धावा केल्या आणि ४ षटकात १२ धावा देत ३ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या.
बांगलादेशने तिसर्या टी-२० सामन्यामध्ये शानदार पुनरागमन केले आणि ४ गडी राखून शानदार विजय नोंदवला. या विजयात रुबिया खान आणि शमीमा सुलताना या विजयाच्या नायक होत्या. रुबियाने ४ षटकात १६ धावा देत ३ बळी घेतले. त्याचबरोबर शमीमाने ४२ धावांची खेळी केली.