Women T20 World cup 2023: महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज टीम इंडियाचा सामना आयर्लंडशी होणार आहे. भारत आणि आयर्लंड संघातील सामना सेंट पार्क जॉर्ज, गेकबेर्हा येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.गेल्या सामन्यात इंग्लंडकडून झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाला उपांत्य फेरी गाठण्यासाठी आजचा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. अशा स्थितीत आज भारतीय संघाला एकही संधी सोडायला आवडणार नाही.
भारतासाठी विजय आवश्यक –
पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजला हरवून भारताने स्पर्धेत शानदार सुरुवात केली होती. पण इंग्लंडकडून झालेल्या पराभवाने टीम इंडियाचा सेमीफायनलचा प्रवास खडतर झाला आहे. भारतीय संघाला आज चांगली संधी असणार आहे. जर टीम इंडियाने आयर्लंडला पराभूत केले, तर भारतीय संघाचा उपांत्य फेरीतील मार्ग सुकर होईल.
विजयासह उपांत्य फेरीचा मार्ग सुकर होईल –
जर भारतीय संघाने आजचा सामना जिंकला, तर तो ४ गुणांसह गट-२ च्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचेल. कारण टीम इंडियाने पहिल्या तीन सामन्यांपैकी २ जिंकले आहेत आणि एकात पराभव झाला आहे. मात्र भारतीय संघाने हा सामना जिंकला तर त्याचे स्थान आणखी मजबूत होईल. सध्या ग्रुप-२ मध्ये इंग्लंड ६ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. वेस्ट इंडिजचे सर्व सामने संपले आहेत. पाकिस्तान संघाने त्यांच्या शेवटच्या सामन्यात जरी इंग्लंडला पराभूत केले, तरी त्यांचे केवळ चार गुण होऊ शकतील.
हेही वाचा – Prithvi Shaw’s selfie controversy: पृथ्वी शॉवर हल्ला करणाऱ्या सपना गिलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
आयर्लंड महिला (प्लेइंग इलेव्हन): एमी हंटर, गॅबी लुईस, ओरला प्रेंडरगास्ट, एमियर रिचर्डसन, लुईस लिटिल, लॉरा डेलेनी (कर्णधार), आर्लेन केली, मेरी वॉल्ड्रॉन (यष्टीरक्षक), लेआ पॉल, कारा मरे, जॉर्जिना डेम्पसी
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), देविका वैद्य, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर सिंग