महिला टी-२० विश्वचषक २०२३ स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळला जात आहे. या स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान संघ आमनेसामने आले. सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक गमावून प्रथम गोलदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ४ बाद १४९ धावा केल्या. त्याचबबरोबर भारतीय संघा समोर १५० धावांचे लक्ष्य ठेवले. या दरम्यान यास्तिका भाटियाने शानदार क्षेत्ररक्षण पाहिला मिळाले.
महिला टी-२० विश्वचषक २०२३ स्पर्धेतील चौथा सामना भरत आणि पाकिस्तान संघात खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी कर्णधार बिस्मा मारुफच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकांत ४ बाद १४९ धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघाला १५० धावांचे लक्ष्य मिळाले. या धावाचा पाठलाग करताना सिद्रा आमीनने शफालीचा शानदार झेल भारतीय संघाला मोठा धक्का दिला.
१५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात दमदार झाली. भारतीय सलामीवीर यास्तिका भाटिया आणि शफाली वर्माने पहिल्या विकेट्ससाठी ३८ धावांचे योगदान दिले. त्यानंतर यास्तिका भाटिया १७ धावांवर बाद झाली. दरम्यान भारताला दुसरा शफाली बाद झाल्याने बसला. सिद्रा आमीनने सीमारेषेवर हवेत उडीत मारत शफालीचा अप्रतिम झेल घेतला. ज्यामुळे भारतीय संघाला मोठा झटका.
शफाली वर्माने २५ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने ३३ धावांचे योगदान दिले. शफाली वर्मा बाद झाली तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या ९.१षटकांत २ बाद ६५ होती. सिद्रा आमीनने घेतलेल्या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
बिस्माहने आयशासोबत पाचव्या विकेटसाठी ४७ चेंडूत नाबाद ८१ धावांची भागीदारी केली. बिस्माहने ५५ चेंडूत ६८ धावांची नाबाद खेळी खेळली. तिने आपल्या खेळीत सात चौकार मारले. त्याचवेळी आयशाने २५ चेंडूत ४३ धावांची नाबाद तुफानी खेळी केली. आपल्या खेळीत तिने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. त्याचबरोबर भारताकडून राधा यादवने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
हेही वाचा – INDW vs PAKW: यास्तिका भाटियाचे शानदार क्षेत्ररक्षण: चौकार अडवण्यासाठी बनली ‘सुपरवूमन’
पाकिस्तान महिला संघ (प्लेइंग इलेव्हन): जावेरिया खान, मुनीबा अली (डब्ल्यू), बिस्मा मारूफ (कर्णधार), निदा दार, सिद्रा अमीन, आलिया रियाझ, आयेशा नसीम, फातिमा सना, आयमान अन्वर, नशरा संधू, सादिया इक्बाल
हेही वाचा – IND vs AUS 2nd Test सामन्यापूर्वी टीम इंडियाचा मोठा निर्णय; जयदेव उनाडकट संघातून बाहेर, जाणून घ्या कारण
भारतीय महिला संघ (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर सिंग