IND vs PAK, World Cup T20 Match Live score Updates: भारतीय संघाने रविवारी महिला टी२० विश्वचषकातील आपल्या मोहिमेला विजयाने सुरुवात केली. भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होता. केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे हा सामना खेळला गेला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २०षटकांत ४ गडी गमावून १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने १९व्या षटकात तीन विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. जेमिमाह रॉड्रिग्स-रिचा घोषच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिलांनी विश्वचषकातील पहिला विजय नोंदवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे रविवारी आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध भारताच्या ब गटातील सामन्यात निदा दारने सात चेंडू टाकले. ही अंपायरिंगची मोठी चूक होती. कोणालाही निदा दारने एका षटकात सहा चेंडूंऐवजी सात चेंडू टाकलेले लक्षात आले नाही. सातव्या षटकात ही घटना घडली जेव्हा निदाने तिचे दुसरे षटक टाकताना तीने सात वेळा चेंडू टाकला. त्यातल्या सातव्या चेंडूला जेमिमाह रॉड्रिग्सने सीमारेषेवर पाठवले आणि भारतासाठी १५० धावांचे आव्हान उभे केले.

तत्पूर्वी, पाकिस्तानने भारतासमोर १५० धावांचे लक्ष्य ठेवले होते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानच्या संघाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात दीप्ती शर्माने जावेरिया खानला हरमनप्रीत कौरकरवी झेलबाद केले. राधा यादवने मुनिबाला यष्टिरक्षक रिचा घोषच्या हातून स्टंप आऊट केले. पूजा वस्त्राकरने निदा दारला खातेही उघडू दिले नाही आणि रिचाकडे झेलबाद झाली. सिद्रा अमीन ११ धावा करू शकली आणि राधाकरवी झेलबाद झाली. आयसीसीकडून याची दखल घेतली जाईल तर यावर कारवाई होण्याची देखील शक्यता आहे.

यानंतर बिस्माहने आयशासोबत पाचव्या विकेटसाठी ४७ चेंडूत ८१ धावांची नाबाद भागीदारी केली. कर्णधार बिस्माहने ५५ चेंडूत ६८ धावांची नाबाद खेळी खेळली. तीने आपल्या खेळीत सात चौकार मारले. त्याचवेळी आयशाने २५ चेंडूत ४३ धावांची तुफानी खेळी केली. अशा प्रकारे २० षटकांनंतर पाकिस्तानने ४ गडी गमावून १४९ धावा केल्या. भारताकडून राधा यादवने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. त्याचवेळी पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा: INDW vs PAKW T20 WC: जेमिमाह रॉड्रिग्सचे तुफान अर्धशतक! भारताने पाकिस्तानच्या ठेचल्या नांग्या, सात विकेट्सने दणदणीत विजय

भारताला विजयासाठी १५० धावांची गरज होती. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला शफाली वर्मा व‌ यास्तिका भाटियाने ३८ धावांची सलामी दिली. भाटिया बाद झाल्यानंतर शफालीने जेमिमाहसह धावांचा वेग वाढवला. शफालीने ३३ धावांची खेळी करून बाद झाली. कर्णधार हरमनप्रीतने आक्रमक १६ धावांचे योगदान दिले. जेमिमाहने ५५ चेंडूत ६८ धावा करत नाबाद राहिली आणि रिचाने २५ चेंडूत ४३ धावा केल्या. जेमिमाहने आपल्या डावात सात चौकार मारले, तर रिचाने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. दोघींमध्ये चौथ्या विकेटसाठी नाबाद ५८ धावांची भागीदारी झाली. आणि १९ व्या षटकात चौकार मारत जेमिमाहने स्वतःचे अर्धशतकही पूर्ण केले आणि विजय मिळवून दिला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indw vs pakw t20 world cup pakistan bowler nida dar bowls seven balls instead of six in an over avw