INDW vs SAW 2nd T20I Match Uma Chhetri Stumping Video Viral : भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात एक कसोटी सामना, ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. टीम इंडियाने एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली आणि एकमेव कसोटी सामनाही एकतर्फी जिंकला. सध्या ५ जुलैपासून दक्षिण आफ्रिका महिला विरुद्ध भारतीय महिला यांच्यात ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील खेळला गेलेला दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला.या सामन्यात भारताकडून पदार्पण करणाऱ्या उमा छेत्रीने यष्टीरक्षण करताना मोठी चूक केली, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत ६ गडी गमावून १७७ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेची सलामीवीर ताजमीन ब्रिट्सने (५२) अर्धशतक झळकावले. त्याचवेळी अनेके बॉश (४०) हिने आपली ताकद दाखवून दिली आणि त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतीय संघासमोर मजबूत लक्ष्य ठेवण्यात यशस्वी ठरला. भारताकडून पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर राधा यादव आणि श्रेयंका पाटील यांनी १-१ गडी विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी भारतीय महिला संघासमोर १७८ धावांचे लक्ष्य होते, परंतु पावसामुळे संघाला फलंदाजी करता आली नाही आणि सामना रद्द झाला.
भारताकडून पदार्पण करणाऱ्या उमा छेत्रीने केली मोठी चूक –
पहिल्या डावातील दुसऱ्याच षटकात सजीवन सजनाच्या चेंडूवर यष्टिरक्षक उमा छेत्रीने सलामीवीर ताजमीन ब्रिटसला यष्टीचीत केले. तथापि, डीआरएसमध्ये दिसले की यष्टीचीत करायच्या अगोदर यष्टिरक्षक उमा छेत्रीचे हॅन्ड ग्लोव्हज यष्टीच्या पुढे आले होते. या चुकीमुळे अंपायरने ताजमीन ब्रिटसला नाबाद घोषित केले. त्याचबरोबर चेंडूही नो बॉल घोषित केला. मात्र, त्यानंतर
दीप्ती शर्माच्या चेंडूवर उमाने पुन्हा यष्टीचीत करत ब्रिटसला ५२ धावांवर रोखले.
हेही वाचा – हार्दिक पंड्याच्या इन्स्टा पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष, सेटबॅकपासून ते कमबॅकपर्यंतचा VIDEO केला शेअर
पहिल्यांदा यष्टीचीत केले तेव्हा ब्रिटस ५ धावांवर फलंदाजी करत होती, पण डावाच्या अखेरीस तिची धावसंख्या ५२ होती. म्हणजेच या चुकीच्या यष्टीचीतसाठी टीम इंडियाला ४७ धावांची किंमत मोजावी लागली. नियमानुसार यष्टीरक्ष काला चेंडू यष्टीच्या पुढे पकडण्याची परवानगी नसते. त्यामुळे फलंदाजाला बाद करण्यासाठी यष्टीरक्षकाला चेंडू यष्टीच्या मागे पकडावा लागतो. अन्यथा तो चेंडू नो बॉल घोषित केला जातो.