World Cup 2023 match ticket registration starts : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भारतात ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक सामन्यांसाठी तिकीट विक्रीची प्रक्रिया सुरू केली आहे. सुधारित वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर तिकिटाची माहितीही शेअर करण्यात आली. सुमारे दीड महिना चालणाऱ्या या मेगा टूर्नामेंटचा अंतिम सामना १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे. स्पर्धेच्या सामन्यांच्या तिकीट विक्रीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने केली जाईल. तिकीट खरेदी करण्यासाठी, चाहत्यांना प्रथम आयसीसी वेबसाइटवर १५ ऑगस्टपासून सुरू झालेल्या नोंदणी प्रक्रियेत स्वतःची नोंदणी करावी लागेल.
ही माहिती नोंदणी करताना भरावी लागेल –
आयसीसीच्या वेबसाइटवर जाऊन http://www.cricketworldcup.com/register या लिंकवर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमची नोंदणी करावी लागेल. यामध्ये चाहत्यांना त्यांचे नाव, देश, मोबाईल नंबर, ईमेल आयडीची माहिती भरावी लागणार आहे. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आयसीसीकडून एक मेल देखील येईल.
भारतीय सामन्यांची तिकीट विक्री ३० ऑगस्टपासून होणार सुरू –
एकदिवसीय विश्वचषकादरम्यान भारतीय संघ ९ वेगवेगळ्या शहरांमध्ये आपले सामने खेळणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ ऑक्टोबरला चेन्नईच्या मैदानावर होणार आहे. भारतीय संघाच्या सामन्यांची तिकिटे ५ वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये उपलब्ध असतील. बुक माय शोच्या अधिकृत वेबसाइटवरून चाहते ही तिकिटे खरेदी करू शकतील.
हेही वाचा – Virat Kohli: “२०१९ मध्ये मला कोहलीला चौथ्या क्रमांकावर खेळवायचे होते, कारण…”; रवी शास्त्रींचा मोठा खुलासा
या तारखांना भारतीय सामन्यांच्या तिकिटांची होणार विक्री –
२५ ऑगस्ट – नॉन इंडिया वार्म-अप सामना आणि नॉन इंडिया इवेंट सामना
३० ऑगस्ट – गुवाहाटी आणि त्रिवेंद्रम येथे भारतीय संघाचे होणारे सामने
३१ ऑगस्ट – चेन्नई, दिल्ली आणि पुणे येथे भारताचे संघाचे होणारे सामने
१ सप्टेंबर – सामने धर्मशाला, लखनौ आणि मुंबई येथे भारताचे संघाचे होणारे सामने
२ सप्टेंबर – बेंगळुरू आणि कोलकाता येथे भारताचे संघाचे होणारे सामने
३ सप्टेंबर – अहमदाबादमधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची तिकीटे
१५ सप्टेंबर – उपांत्य आणि अंतिम सामन्यांची तिकिटे