दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस पाकिस्तान सुपर लीग काल सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करत असताना गंभीर जखमी झाला आहे. त्याला आता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
काल ही घटना घडली आहे. क्वेटा ग्लेडिएटर्स विरुद्ध पेशावर जाल्मी यांच्यात पाकिस्तान सुपर लीगचा १९ वा सामना सुरु होता. या सामन्यादरम्यान प्लेसिसची पेशावर जाल्मीचा खेळाडू मोहम्मद हसनैनशी धडक झाली. दोन्ही खेळाडू बाऊंड्री अडवण्याच्या प्रयत्नात असताना एकमेकांना धडकले आणि खाली पडले. हसनैनचा गुडघा प्लेसिसला लागला आणि त्याच्या मानेला दुखापत होऊन तो खाली पडला.
#FafduPlessis Get Well Soon Dear Faf you are my one of the favorite players of cricket RT if yours pic.twitter.com/dEp0k7FgBz
— Jaishiv Gupta (@shriraamcharan2) June 13, 2021
पाकिस्तानच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लेसिसला तात्काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. काही वेळानंतर तो पुन्हा पॅव्हिलियनमध्ये बसलेला दिसून आला. त्याचबरोबर त्याच्या मानेला दुखापत झाल्याचंही कळून येत होतं.
क्वेटा ग्लॅडिएटर्सने आता पर्यायी खेळाडू म्हणून सैयम अय्यूबला मैदानात उतरवलं आहे. प्लेसिस IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या बाजूने खेळतो.
हा सामना पेशावर जाल्मी या संघाने ६१ धावांनी जिंकला. पेशावरने आधी बॅटिंग करत ५ बाद १९७ धावा केल्या होत्या. तर क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाने मात्र १३६ धावांवरच समाधान मानलं.
प्लेसिसने या वर्षी क्वेटा ग्लॅडिएटर्स संघासोबत करार केला होता. PSL चे उर्वरित सामने ९ जूनपासून UAE मध्ये होत आहेत. या आधीचे सर्व सामने मार्च महिन्यात कराचीमध्ये खेळले गेले. मात्र करोनाच्या प्रादुर्भावामुळे ह्या सामन्यांना अनिश्चित काळापर्यंत स्थगिती देण्यात आली होती.