भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आशिया चषकामधून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात झालेल्या पाठीच्या दुखापतीमुळे पांड्याला संघाबाहेर जावं लागणार आहे, पांड्याच्या जागी दिपक चहरची संघात निवड करण्यात आलेली आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला यासंदर्भात दुजोरा दिला आहे. पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजी करत असताना १८ व्या षटकात हार्दिक पांड्याच्या पाठीला दुखापत झाली होती, यानंतर त्याला स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर नेण्यात आलं होतं. त्यामुळे पांड्याच्या अनुपस्थितीचा टीम इंडियाला आगामी सामन्यांमध्ये फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

Story img Loader