इंटर मिलान आणि लिऑन यांची विजयी घोडदौड कायम राखत युरोपा लीग फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत मजल मारली आहे. मात्र गतविजेत्या अ‍ॅटलेटिको माद्रिद संघाला मात्र बादफेरीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
लिव्हरपूलला रशियाच्या आंझी माखाचकाला संघाकडून ०-१ असे पराभूत व्हावे लागल्याने त्यांच्या बादफेरीच्या आशा धूसर झाल्या आहेत. उरुग्वेचा आघाडीवीर एडिन्सन काव्हानी याने केलेल्या चार गोलांच्या बळावर नापोली संघाने ‘फ’ गटात डिनिप्रो संघावर ४-२ अशी दणदणीत मात केली. ‘ह’ गटातून इंटर मिलानने बेलग्रेडवर ३-१ असा विजय मिळवून दोन सामने शिल्लक राखून आगेकूच केली. लिऑनने अ‍ॅटलेटिको बिलबाओ संघावर ३-२ अशी मात करून बाद फेरी गाठली.
‘ब’ गटातून अ‍ॅकाडमिका संघाने ४३ वर्षांतील पहिला विजय नोंदवला. त्यांनी अ‍ॅटलेटिको संघाला २-० अशी धूळ चारून सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. जर्मेन डेफोए याने हॅट्ट्रिक साजरी करत टॉटनहॅमच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. टॉटनहॅमने मरिबोर संघाला ३-१ असे हरवले. लेव्हरकुसेन आणि मेटालिस्ट या संघांनी ‘क’ गटातून आगेकूच केली. लेव्हरकुसेनने रॅपिड व्हिएन्नाला ३-०ने तर मेटालिस्टने रोसेनबर्गला ३-१ने हरवले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा