शनिवारी मेलबर्नमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे ऑस्ट्रेलियन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीआधी होणाऱ्या सराव शर्यती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता रविवारी होणाऱ्या मुख्य शर्यतीआधीच सकाळी सराव शर्यती घेतल्या जातील.
‘‘आकाशात काळे ढग दाटून आले होते. तसेच पाऊस थांबण्याची कोणतीच चिन्हे दिसत नव्हती. त्यामुळेच आम्ही सराव शर्यती रविवारी सकाळी घेण्याचा निर्णय घेतला. आमचा हा निर्णय योग्य म्हणावा लागेल. ढगाळ वातावरणात शर्यत घेणे शक्यच नव्हते. ड्रायव्हर्ससाठी ते धोक्याचे ठरले असते,’’ असे स्पर्धा संचालक चार्ली व्हायटिंग यांनी सांगितले. २०१०च्या जपान ग्रां. प्रि.नंतर प्रथमच सराव शर्यती आणि मुख्य शर्यत एकाच दिवशी होत आहेत.

Story img Loader