भारतीय संघाचा मधल्या फळीतला महत्वाचा खेळाडू मनिष पांडे नुकताच लग्नाच्या बेडीत अडकला. अभिनेत्री अश्रिता शेट्टीशी मनिष पांडेंने लग्न केलं असून सोमवारी मुंबईत हा सोहळा पार पडला. या विवाहसोहळ्याची क्षणचित्र सोशल मीडियावर आल्यानंतर, भारतीय संघातील मनिष पांडेंच्या सहकाऱ्यांनी त्याचं अभिनंदन केलं.

मनिष पांडेचा आयपीएलमधील सहकारी राशिद खाननेही ट्विटरवरुन मनिषचं अभिनंदन केलं आहे. यावेळी राशिदने मनिषला, मला लग्नाला का बोलावलं नाहीस?? असं म्हणत त्याची फिरकी घेतली. मनिष आणि राशिद आयपीएलमध्ये सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळतात.

लग्नसोहळ्यानंतर मनिष पांडे वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिकेसाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे मनिषच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Story img Loader