आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) बंदीची कारवाई करु नये यासाठी भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे (आयओए) दोन प्रतिनिधी आता आयओसीलाच साकडे घालणार आहेत.
आयओसीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी नरेंद्र बात्रा व आर.के.आनंद यांनी आयओएकडून परवानगी मिळविली असून हे दोन्ही पदाधिकारी स्वित्झर्लंडकडे रवाना होत आहेत. आयओसीच्या कार्यकारिणीची बैठक ४ व ५ डिसेंबर रोजी होणार असून त्यामध्ये आयओएवर बंदी घालण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. आयओएच्या निवडणुका केंद्रशासनाच्या क्रीडा नियमावलीनुसार घेतल्या जात असल्यामुळे आयओसीने आयओएवर बंदीची कारवाई करण्याचा इशारा दिला होता. हॉकी इंडियाचे सरचिटणीस बात्रा यांनी सांगितले, आम्ही यापूर्वीच विमानाची तिकिटे निश्चित केली आहेत मात्र आम्ही आयओसीकडून याबाबत निर्णयाची वाट पहात आहोत. आम्ही आमची बाजू मांडण्याची संपूर्ण तयारी केली असून याबाबत भारताच्या बाजूने निर्णय लागेल अशी आम्हाला खात्री वाटत आहे.  

Story img Loader