भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना यांना वृत्तांकन करताना रोखल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) कडाडून टीका केली आहे. बीसीसीआयने नवे र्निबध लादल्यामुळे आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी इंग्लंडच्या भारत दौऱ्याचे वार्ताकन करण्यावर बहिष्कार घातला आहे. आयओसीच्या वृत्त आयोगाचे अध्यक्ष केव्हान गॉस्पर यांनी या प्रकरणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या प्रकरणी मध्यस्थी करण्याची आणि वृत्तसंस्थांना मुक्तपणे वार्ताकन करू देण्याची मागणी केली आहे.

Story img Loader