सन २०२० मध्ये होणाऱया ऑलिम्पिक स्पर्धांतून कुस्ती क्रीडाप्रकार वगळण्याचा निर्णय मंगळवारी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने घेतला. या निर्णयामुळे २०२० मध्ये होणाऱया ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कुस्तीपटू सहभागी होऊ शकणार नाही. या निर्णयाचा भारतातील कुस्तीपटूंच्या करिअरवर परिणाम होणार आहे. या निर्णयाबद्दल क्रीडाक्षेत्रातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारी मंडळाची मंगळवारी येथे बैठक झाली. त्यामध्ये २६ क्रीडाप्रकारांचा पुढील ऑलिम्पिकच्या दृष्टिने आढावा घेण्यात आला. समितीच्या नियमांप्रमाणे एक क्रीडाप्रकार वगळल्यामुळे त्यापुढील ऑलिम्पिकपासून नव्या क्रीडाप्रकाराच समावेश करता येऊ शकतो.
१८९६पासून ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये कुस्ती हा क्रीडाप्रकार आहे. समितीच्या कार्यकारी मंडळाची बैठक मेमध्ये रशिया येथे होत आहे. त्यावेळी कुस्तीऐवजी नवा कोणता प्रकार २०२०च्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी करून घ्यायचा यावर निर्णय होईल. समितीने यापूर्वी २००५ मध्ये बेसबॉल आणि सॉफ्टबॉल हे क्रीडाप्रकार ऑलिम्पिक स्पर्धांतून वगळले होते.

Story img Loader