रिओ (ब्राझील) येथे २०१६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत काही खेळांचा नव्याने समावेश व्हावा, यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीपुढे (आयओसी) प्रस्ताव येत असून त्यावर आयओसी विचार करीत आहे. तीन-अ-साइड बास्केटबॉल, बीएमएक्स फ्रीस्टाईल आदी काही नवीन खेळांचा समावेश करण्याबाबत आयओसी विचार करीत आहे. त्याखेरीज ऑलिम्पिक क्रीडाप्रकारांपैकी काही खेळांच्या आंतरराष्ट्रीय महासंघांनी बदल सुचविले आहेत तर काही महासंघांनी वाढीव शर्यती व गटांचा प्रस्ताव दिला आहे असे आयओसीचे क्रीडा संचालक ख्रिस्तोफर दुबी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ऑलिम्पिकची लोकप्रियता वाढविणे हेच आमचे ध्येय आहे. रिओ येथील ऑलिम्पिकमध्ये २८ क्रीडा प्रकारांचा समावेश राहणार आहे. १० हजार ७०० खेळाडू ३०६ सुवर्णपदकांसाठी लढतील. महिलांच्या बॉक्सिंगला अतिशय लोकप्रियता लाभली आहे. लंडन येथे झालेल्या स्पर्धेत २६ क्रीडा प्रकारांचा समावेश होता. टेनिसमधील मिश्रदुहेरीच्या लढतींमध्ये अतिशय अव्वल दर्जाचा खेळ पहावयास मिळाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा