क्रिकेटपटूंना पैसा आणि मुली यांची लालूच दाखवून घडवण्यात आलेल्या ‘स्पॉट फिक्सिंग’ची पाऊले बीसीसीआय आणि आयपीएल फ्रँचायझींच्या दारातूनच बाहेर आल्याचे आता उघड होत आहे. सट्टेबाजीप्रकरणी अटक करण्यात आलेला अभिनेता विंदू दारासिंग हा बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई व चेन्नई सुपर किंग्जचा सीईओ गुरूनाथ मय्यपन याच्या सातत्याने संपर्कात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे मय्यपन याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष आणि चेन्नई सुपर किंग या संघाचे अध्यक्ष श्रीनीवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पन उर्फ गुरू हा गेल्या सहा वर्षांपासून विंदूचा संपर्कात होता. त्या दोघांचे सतत फोनवर बोलणे व्हायचे. पोलीस विंदूच्या मोबाइल्सचे कॉल डिटेल्स तपासत आहे. गुरुनाथचा सट्टेबाजी प्रकरणाशी संबंध आहे का ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. गुरूनाथ याला क्रिकेटबद्दल फारशी माहिती नाही, असे विंदूने पोलिसांच्या चौकशीत सांगितले. मात्र, या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे पोलीस तपासत आहेत.
‘फिक्सिंग’ची पावले बीसीसीआयच्या दारात?
क्रिकेटपटूंना पैसा आणि मुली यांची लालूच दाखवून घडवण्यात आलेल्या ‘स्पॉट फिक्सिंग’ची पाऊले बीसीसीआय आणि आयपीएल फ्रँचायझींच्या दारातूनच बाहेर आल्याचे आता उघड होत आहे. सट्टेबाजीप्रकरणी अटक करण्यात आलेला अभिनेता विंदू दारासिंग हा बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई व चेन्नई सुपर किंग्जचा सीईओ गुरूनाथ मय्यपन याच्या सातत्याने संपर्कात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-05-2013 at 03:20 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2013 spot fixing issue reached at bcci door steps