करुण नायरच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर ७ विकेट्सनी विजय मिळवला. १५२ धावांचा पाठलाग करताना करुण नायरने ७३ धावांची खेळी केली. संजू सॅमसनने ३४ धावा करत त्याला चांगली साथ दिली. तत्पूर्वी दिल्ली डेअरडेव्हिल्सने प्रथम फलंदाजी करताना १५२ धावांची मजल मारली. क्विंटन डि कॉकने ५ चौकार आणि एका षटकारासह ४२ धावांची खेळी केली. जेपी डय़ुमिनीने ३१ चेंडूत ३९ धावांची खेळी केली. केदार जाधवने १४ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह २८ धावा फटकावल्या.
संक्षिप्त धावफलक : दिल्ली डेअर डेव्हिल्स : २० षटकांत ५ बाद १५२ (क्विंटन डि कॉक ४२, जेपी डय़ुमिनी ३९, प्रवीण तांबे २/२५) पराभूत विरुद्ध राजस्थान रॉयल्स : १८.३ षटकांत ३ बाद १५६ (करुण नायर ७३, शमी मोहम्मद १/२२)  
सामनावीर :  करुण नायर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा