लागोपाठच्या पराभवांमुळे खचलेल्या राजस्थान रॉयल्स संघाला आता सावरण्याची नितांत आवश्यकता आहे. शनिवारी राजस्थानची एकापेक्षा एक दिग्गज फलंदाजांचा समावेश असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी गाठ पडणार आहे . आयपीएलच्या सातव्या हंगामात पहिल्या दोन विजयांनिशी दमदार प्रारंभ करणाऱ्या बंगळुरूचा विजयरथ गुरुवारी कोलकाता रोखण्याची किमया साधली होती. दुसरीकडे राजस्थानने सलामीच्या सामन्यात हैदराबादविरुद्ध अखेरच्या षटकात विजय संपादन केला. पण त्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाब व चेन्नई सुपर किंग्जकडून हार पत्करली.
फलंदाजी व गोलंदाजीतील समस्या सोडवण्यासाठी आता कर्णधार शेन वॉटसनने योग्य व्यूहरचना आखण्याची गरज आहे. वॉटसन, अजिंक्य रहाणे, संजू सॅमसन यांच्याकडून फलंदाजी होत आहे, परंतु सातत्याचा अभाव जाणवत आहे. या सामन्यात राजस्थानपेक्षा बंगळुरूचे पारडे जड आहे.
संघ :
राजस्थान रॉयल्स : शेन वॉटसन (कर्णधार), अजिंक्य रहाणे, जेम्स फॉकनर, स्टुअर्ट बिन्नी, संजू सॅमसन, ब्रॅड हॉज, स्टीव्हन स्मिथ, अभिषेक नायर, बेन कटिंग, केन रिचर्डसन, टीम साऊदी, उन्मुक्त चंद, अंकुश बैन्स, विक्रमजीत मलिक, राहुल टेवाटिया, अंकित शर्मा, अमित मिश्रा (कनिष्ठ), दीपक हुडा, रजत भाटिया, केव्हॉन कूपर, इक्बाल अब्दुल्ला, धवल कुलकर्णी, प्रवीण तांबे, करुण नायर, दिशांत याग्निक.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली (कर्णधार), ए बी डी’व्हिलियर्स, ख्रिस गेल, युवराज सिंग, मिचेल स्टार्क, अ‍ॅल्बी मॉर्केल, वरुण आरोन, अशोक दिंडा, पार्थिव पटेल, मुथय्या मुरलीधरन, रवी रामपॉल, निक मॅडिन्सन, हर्शल पटेल, विजय झोल, अबू नचिम, सचिन राणा, शदाब जकाती, संदीप वॉरियर, तन्मय मिश्रा, योगेश ताकवले, युजवेंद्र चहल.

Story img Loader