आयपीएलच्या अकराव्या हंगामाच्या लिलावाच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा वरचष्मा राहिलेला पहायला मिळाला. प्रत्येक संघ मालकांनी अखेरच्या सत्रामध्ये भारतीय खेळाडूंना खरेदी करण्यामध्ये रस दाखवला. या कारणामुळे अनेक स्थानिक क्रिकेटपटूंना पहिल्या दिवशीच्या लिलावात कोट्यवधींच्या बोली लागलेल्या पहायला मिळाल्या. पहिल्या दिवसाचा लिलाव हा अनेक खेळाडूंसाठी सरप्राईज पॅकेजही ठरला. अनेक संघमालकांनी आपल्या जुन्या खेळाडूंना कायम न राखता नवीन खेळाडू घेण्याकडे आपला भर दिला. चेन्नई सुपर किंग्जमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या गळ्यातला ताईत मानला जाणारा रविचंद्रन आश्विन यंदाच्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाकडून खेळताना दिसणार आहे. पंजाबच्या संघाने आश्विनला ७ कोटी ६० लाखांची बोली लावत आपल्याकडे घेतलं. तर दुसरीकडे गेली १० वर्ष मुंबई इंडियन्स संघाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या हरभजन सिंहला यंदा नवीन घर मिळालेलं आहे. २ कोटींच्या बोलीवर यंदा चेन्नई सुपर किंग्ज संघाने हरभजनला आपल्या संघात घेतलं आहे. याव्यतिरीक्त अनेक खेळाडू अकराव्या हंगामात आपल्या जुन्या संघाला रामराम करत नवीन संघाकडून खेळताना दिसणार आहेत.
बेन स्टोक्स ठरला सर्वात महागडा खेळाडू –
इंग्लंडचा बेन स्टोक्स पहिल्या दिवशीच्या लिलावातला सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्सच्या संघाने तब्बल १२ कोटी ५० लाख रुपये मोजून त्याला आपल्या ताफ्यात दाखल केलं आहे. सध्या स्टोक्स इंग्लंड संघाचं प्रतिनिधीत्व करत नसला, तरीही मागच्या हंगामात पुण्याच्या संघाकडून त्याने केलेली कामगिरी पाहता अनेक संघमालकांनी त्याला आपल्या गोटात खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर राजस्थान रॉयल्सच्या संघमालकांना स्टोक्सला आपल्या संघात घेण्यामध्ये यश आलं. याव्यतिरीक्त ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस लीन, ख्रिस वोक्स, मार्क्स स्टॉयनिस या परदेशी खेळाडूंनाही चांगल्या रकमेची बोली पहायला मिळाली. महत्वाची गोष्ट म्हणजे विंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलला घेण्यात कोणत्याही संघमालकाने स्वारस्य दाखवलं नाही.
अनुभवी भारतीय खेळाडूंचा भाव घटला –
एक काळ आयपीएलचा हंगाम गाजवणाऱ्या अनुभवी भारतीय खेळाडूंना यंदाच्या हंगामात थोडक्यात समाधान मानावं लागलं आहे. अनेक खेळाडूंना संघमालकांनी त्यांच्या मूळ किमतीवरच विकत घेतलं आहे. काही वर्षांपूर्वी लिलावात १० कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळवणाऱ्या युवराज सिंहला यंदाच्या हंगामात अवघ्या २ कोटींवर समाधान मानावं लागलं. त्याला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने विकत घेतलं. तर हरभजन सिंहलाही आपल्या मुळ रकमेपेक्षा जास्त रक्कम मिळवण्यात अपयश आलं. कोलकाता नाईट रायडर्सचा माजी कर्णधार गौतम गंभीर यंदा दिल्लीच्या गोटात परतला आहे. मात्र लिलावात त्यालाही २ कोटी ८० लाखांच्या बोलीवर समाधान मानावं लागलं. तर मुरली विजयकडे पहिल्या दिवशी संघमालकांनी पाठ फिरवली.
तरुण खेळाडूंची कोटीच्या कोटी उड्डाणे, U-१९ संघातील खेळाडूंनाही चांगला भाव –
एकीकडे अनुभवी खेळाडूंच्या झोळीत फारशी रक्कम आलेली नसली तरीही तरुण खेळाडूंनी आजचा पहिला दिवस चांगलाच गाजवला. भारताकडून मनिष पांडे आणि लोकेश राहुल या खेळाडूंना तब्बल ११ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली. मनिष पांडे यंदाच्या हंगामात सनराईजर्स हैदराबाद तर लोकेश राहुल किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार आहे. याव्यतिरीक्त केदार जाधव, मोहम्मद शमी, कृणाल पांड्या, करुण नायर या खेळाडूंनीही चांगल्या रकमेची कमाई केली. दुसरीकडे भारताच्या १९ वर्षाखालील शुभमन गिल, कमलेश नागरकोटी, पृथ्वी शॉ या खेळाडूंनाही आजच्या लिलावात चांगली रक्कम मिळाली.
आजच्या दिवसात ज्या खेळाडूंवर बोली लागली नाही, त्यांना उद्याच्या दिवशी आणखी एक संधी दिली जाणार आहे. संघमालकांशी चर्चा करुन बोली न लागलेल्या खेळाडूंची परत यादी बनवली जाईल, आणि त्यांच्या मुळ रकमेत कपात करुन पुन्हा एकदा त्यांच्यावर बोली लावली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या लिलावात नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
- अंकित सिंह राजपूत ३ कोटींच्या बोलीवर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे
- नवदीप सैनी ३ कोटीच्या बोलीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे
- सईद खलीद अहमद ३ कोटींच्या बोलीवर सनराईजर्स हैदराबाद संघाकडे
- बसिल थम्पी ९५ लाखांच्या बोलीवर सनराईजर्स हैदराबाद संघाकडे
- टी. नटराजन ४० लाखांच्या बोलीवर सनराईजर्स हैदराबाद संघाकडे
- सिद्धार्थ कौल ३ कोटी ८० लाखांच्या बोलीवर सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार
- कुलवंत खेजरोलिया ८५ लाखांच्या बोलीवर रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळणार
- मुंबई रणजी संघाचा कर्णधार आदित्य तरेवर बोली नाही
- इशान किशन ६ कोटी २० लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्स संघाकडे
- जोफ्रा आर्चर राजस्थान रॉयल्सच्या संघात, बोली ७ कोटी २० लाख
- ऑस्ट्रेलियाचा डार्सी शॉर्ट ४ कोटींच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार
- नितीश राणा ३ कोटी ४० लाखांच्या बोलावर कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे
- कृणाल पांड्या ८ कोटी ८० लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्स संघाकडे
- कमलेश नागरकोटी ३ कोटी २० लाखांच्या बोलीवर कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणार
- दिपक हुडा ३ कोटी ६० लाखांच्या बोलीत सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार
- विजय शंकर ३ कोटी २० लाखांच्या बोलीत दिल्ली डेअर डेविल्स संघाकडून खेळणार
- राहुल तेवतिया ३ कोटींच्या बोलीवर दिल्ली डेअर डेविल्स संघाकडून खेळणार
- मुंबईकर पृथ्वी शॉ दिल्ली डेअर डेविल्स संघाकडून खेळणार, दिल्लीकडून पृथ्वी शॉला १ कोटी २० लाखांची बोली
- सिद्धेश लाडला कोणत्याही संघाकडून बोली नाही
- राहुल त्रिपाठी ३ कोटी ४० लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार
- मयांक अग्रवाल १ कोटींच्या बोलीवर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार
- रिकी भुई २० लाखांच्या बोलीवर सनराईजर्स हैदराबाद संघाकडे
- इशान जग्गी २० लाखांच्या बोलीवर कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे
- शुभमन गिल १ कोटी ८० लाखांच्या बोलीवर कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे
- अकराव्या हंगामात सुर्यकुमार यादव घरच्या संघाकडून खेळणार, मुंबई इंडियन्सकडून ३ कोटी २० लाखांची बोली
- चायनामन कुलदीप यादव कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे, राईट टू मॅच कार्डाद्वारे ५ कोटी ८० लाखांची बोली
- युझवेंद्र चहल ६ कोटींच्या बोलीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे
- अमित मिश्रा दिल्ली डेअर डेविल्स संघाकडे, बोली ४ कोटी
- अफगाणिस्तानच्या राशिद खानला तब्बल ९ कोटींची बोली, राईट टू मॅच कार्डाद्वारे हैदराबाद संघाने लावली बोली
- अफगाणिस्तानच्या राशिद खानसाठी संघमालकांमध्ये चढाओढ
- कर्ण शर्मा चेन्नई सुपर किंग्ज संघाकडे, बोली ५ कोटी
- न्यूझीलंडच्या इश सोढीला बोली नाही
- इम्रान ताहिर १ कोटी रुपयांच्या बोलीवर चेन्नई सुपर किंग्ज संघात
- पियुष चावला कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे, बोली ४ कोटी २० लाख
- लसिथ मलिंगाला पहिल्या फेरीत कोणत्याही संघाकडून बोली नाही
- कगिसो रबाडा दिल्ली डेअरडेविल्स संघाकडे, राईट टू मॅच कार्डाद्वारे ४ कोटी २० लाखांची बोली
- मोहम्मद शमी नवीन हंगामातही दिल्लीकडून खेळणार, राईट टू मॅच कार्डाद्वारे शमीवर ३ कोटींची बोली
- भारताच्या इशांत शर्मालाही पहिल्या फेरीत बोली नाही
- न्यूझीलंडच्या टीम साऊदीला मात्र बोली नाही
- विदर्भ एक्स्प्रेस उमेश यादव बंगळुरुच्या यार्डात, रॉयल चॅलेंजर्सकडून ४ कोटी २० लाखांची बोली
- ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स मुंबई इंडियन्सकडे, बोली ५ कोटी ४० लाख
- मिचेल जॉन्सन, जॉश हेजलवूड यांच्यावर कोणत्याही संघाकडून बोली नाही
- बांगलादेशचा जलदगती गोलंदाज मुस्तफिजुर रेहमान मुंबई इंडियन्स संघाकडे, बोली २ कोटी २० लाख
- बटलरवर राजस्थानकडून ४ कोटी ४० लाखांची बोली
- इंग्लंडचा जोस बटलर आगामी हंगामात राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार
- इंग्लंडच्या सॅम बिल्गींज्गवर बोली नाही
- अंबाती रायडू नवीन हंगामात चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळणार, बोली २ कोटी २० लाख
- संजू सॅमसनला तब्बल ८ कोटी रुपयांची बोली, नवीन हंगामात राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार
- रॉबिन उथप्पा पुन्हा एकदा कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे, राईट टू मॅच कार्डाद्वारे कोलकात्याची ६ कोटी ४० लाखांची बोली
- नमन ओझावर बोली नाही
- दिनेश कार्तिक कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे, बोली ७ कोटी ४० लाख
- वृद्धीमान साहावर ५ कोटी रुपयांची बोली, सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार साहा
- जॉनी बेअरस्ट्रोवर बोली नाही
- क्विंटन डी कॉक २ कोटी ८० लाखांच्या बोलीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे
- पार्थिव पटेलला बोली नाही
- इंग्लंडचा मोईन अली १ कोटी ७० लाखांच्या बोलीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळणार
- मार्कस स्टॉयनिस ६ कोटी २० लाखांच्या बोलीत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार
- न्यूझीलंडचा कॉलिन मुनरो १ कोटी ९० लाखांच्या बोलीत दिल्ली डेअरडेविल्स संघाकडे
- युसूफ पठाणवर १ कोटी ९० लाखांची बोली, नवीन हंगामात सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार
- ऑस्ट्रेलियाच्या जेम्स फॉल्कनरवर बोली नाही
- कॉलिन डी ग्रँडहोम रॉयल चँलेजर्स बंगळुरु संघाकडे, बोली २ कोटी २० लाख रुपये
- शेन वॉटसनवर ४ कोटी रुपयांची बोली, धोनीच्या संघात आणखी एक अष्टपैलू खेळाडू
- मराठमोळा केदार जाधव ७ कोटी ८० लाखांच्या बोलीत चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडे
- कार्लोस ब्रेथवेटवर २ कोटी रुपयांची बोली, नवीन हंगामात सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार
- इंग्लंडचा ख्रिस वोक्स ११ व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणार, वोक्सवर ७ कोटी ४० लाखांची बोली
- मनिष पांडेवर ११ कोटी रुपयांची बोली, नवीन हंगामात सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार पांडे
- न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीलवर पहिल्या फेरीत बोली नाही
- दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलावर पहिल्या फेरीत बोली नाही
- ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू ख्रिस लिन कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे, लिनवर ९ कोटी ६० लाखांची बोली
- इंग्लंडचा जेसन रॉय १ कोटी ५० लाखांच्या बोलीत दिल्ली डेअरडेविल्स संघाकडे
- ब्रँडन मॅक्यूलम ३ कोटी ६० लाखांच्या बोलीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे
- अॅरोन फिंचवर किंग्ज इलेव्हन पंजाबकडून ६ कोटी २० लाखांची बोली
- डेव्हिल मिलर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे, राईट टू मॅच कार्डाद्वारे ३ कोटी रुपयांची बोली
- मुरली विजयवर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाची बोली नाही
- राहुलवर ११ कोटी रुपयांची बोली
- लोकेश राहुलला आपल्या संघात घेण्यात किंग्ज इलेव्हन पंजाब यशस्वी
- अखेर किंग्ज इलेव्हन पंजाब यशस्वी, करुण नायरला ५ कोटी ६० लाखांची बोली
- मुळ रक्कम ५० लाखांवरुन करुण नायरची कोट्यांमध्ये घौडदौड
- करुण नायरसाठी पंजाब आणि राजस्थानच्या संघमालकांमध्ये चढाओढ
- दुसऱ्या सत्रातल्या खेळाडूंचा लिलाव संपला, ५ मिनीटांची विश्रांती
- युवराज सिंह नवीन हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार, युवराजवर २ कोटी रुपयांची बोली
- इंग्लंडच्या जो रुटवर कोणत्याही संघाकडून बोली नाही
- केन विलियमसन ३ कोटी रुपयांच्या बोलीवर सनराईजर्स हैदराबाद संघात
- ब्राव्होवर ६ कोटी ४० लाखांची बोली
- राईट टू मॅच कार्डाद्वारे चेन्नई सुपर किंग्जने ड्वेन ब्राव्होला संघात परत घेतलं
- गौतम गंभीरवर २ कोटी ८० लाखांची बोली
- गौतम गंभीर माहेरी परतला, नवीन हंगामात दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून खेळणार
- ग्लेन मॅक्सवेल ९ कोटी रुपयांमध्ये दिल्ली डेअरडेविल्स संघाकडून खेळणार
- हैदराबाद विरुद्ध दिल्लीच्या लढाईत दिल्लीची बाजी
- ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलसाठी संघमालकांमध्ये पुन्हा एकदा चढाओढ
- बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन सनराईजर्स हैदराबाद संघाकडे, बोली २ कोटी रुपये
- मुंबई इंडियन्सचा हरभजन सिंह चेन्नईच्या ताफ्यात, हरभजनवर २ कोटी रुपयांची बोली
- पहिल्या खेळाडूंचा संच संपला, आता १५ मिनीटांची विश्रांती
- ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क ९ कोटी ४० लाखांच्या बोलीत कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे
- अजिंक्य रहाणे माहेरी परतला, राजस्थान रॉयल्सची रहाणेवर राईट टू मॅच कार्डाद्वारे ४ कोटींची बोली
- डु प्लेसीसवर १ कोटी ६० लाखांची बोली
- दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसीस राईट टू मॅच कार्डाद्वारे चेन्नई सुपर किंग्जकडे
- बेन स्टोक्स राजस्थान रॉयल्स संघाकडे, बोली १२ कोटी ५० लाख
- इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्ससाठी संघमालकांमध्ये चढाओढ
- वेस्ट इंडिजचा धडाकेबाज खेळाडू ख्रिस गेलवर पहिल्या फेरीत कोणत्याही संघाकडून बोली नाही
- कायरन पोलार्ड मुंबई इंडियन्स संघाकडे, राईट टू मॅच कार्डाद्वारे ५ कोटी ४० लाखांची बोली
- अखेर रविचंद्र आश्विन किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे, ७ कोटी ६० लाखांच्या बोलीत नवीन संघाकडून खेळणार
- रविचंद्रन आश्विनसाठी संघमालकांमध्ये चढाओढ
- राईट टू मॅच कार्डाद्वारे शिखर ५ कोटी २० लाखात हैदराबाद संघाकडे
- पहिल्या खेळाडूची बोली लागली, शिखर धवन सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार